रेतीच्या अवैध वाहतुकीवर आळा घाला

By Admin | Updated: June 2, 2015 00:31 IST2015-06-02T00:31:32+5:302015-06-02T00:31:32+5:30

जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर तत्काळ आळा घालण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार...

Stop the illegal traffic of the sand | रेतीच्या अवैध वाहतुकीवर आळा घाला

रेतीच्या अवैध वाहतुकीवर आळा घाला

त्रिमूर्ती चौकात उपोषण : टाकळी परिसरात रेतीचे ढिगारे
भंडारा : जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर तत्काळ आळा घालण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचच्या वतीने आज सोमवारी सकाळी ११ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला.
भंडारा जिल्ह्यातील रेतीघाटावरून क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रक-ट्रॅक्टरमध्ये भरून दिल्या जात आहे. रेती वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. भंडारा शहरात अनेक ठिकाणी कोट्यवधी रूपयांची अवैध रेतीचा साठा जमा केलेला आहे. हा सर्व प्रकार सुरू असतानाही जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहेत. कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. याकरीता अवैध रेती वाहतूक बंद करण्यात यावे, नादुरूस्त रस्ते दुरूस्त करण्यात यावे, रेतीमाफियांच्या संपत्तीची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, ज्या रेतीमाफियांवर तीन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अशांवर मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना जिल्हा बंदी करण्यात यावी, शहरात बेकायदेशीर जमा असलेली रेती शासन दरबारी जमा करावी व त्याचा तात्काळ लिलाव करण्यात यावा, संयुक्त समिती नेमूण अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अवैध गौण खनिज चोरीसाठी वीज धारकास जबाबदार धरणे आवश्यक आहे, त्यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, जिल्ह्यातील रेती उत्खनन करण्यासाठी आतापर्यंत लीज धारकांनी किती मनुष्यबळ लावला, त्याची योग्य चौकशी होवून कारवाई करण्यात यावी, जेसीबीद्वारे रेती उत्खनन करण्याची मनाई असताना कुणाच्या आशिर्वादाने जेसीबीद्वारे उत्खनन करता याची शहनिशा करण्यात यावी आदी मागण्यांसाठी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. उपोषणाला सुरज परदेशी, मेहमुद अली, विजय क्षीरसागर, विष्णूदास लोणारे, पुरूषोत्तम कांबळे, दलिराम भुते, त्रिवेणी वासनिक, अजय वासनिक यांचा सहभाग आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Stop the illegal traffic of the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.