शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

शेतकऱ्यांचे पुन्हा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 05:00 IST

सालई खुर्द येथे महामार्गावर बुधवारी सकाळी १० वाजता उसर्रा, सालई खुर्द, टांगा, पालडाेंगरी, सिहरी, बपेरा, नेरला, रामपूर गावातील शेतकरी एकत्र आले. आणि त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे गत आठवड्यात बावनथडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले तेव्हा लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने शेतकरी पुन्हा बुधवारी रस्त्यावर उतरले.

ठळक मुद्देसालई येथे आंदोलन : बावनथडीच्या पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर 

लोकमत न्यूज नेटवर्क आंधळगाव : बावनथडी प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडण्याच्या मागणीसाठी पुन्हा शेतकरी रस्त्यावर उतरले असून बुधवारी मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे तुमसर-रामटेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.सालई खुर्द येथे महामार्गावर बुधवारी सकाळी १० वाजता उसर्रा, सालई खुर्द, टांगा, पालडाेंगरी, सिहरी, बपेरा, नेरला, रामपूर गावातील शेतकरी एकत्र आले. आणि त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. विशेष म्हणजे गत आठवड्यात बावनथडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले तेव्हा लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याने शेतकरी पुन्हा बुधवारी रस्त्यावर उतरले. आंदोलनस्थळी आंधळगावचे ठाणेदार दीपक वानखेडे, तुमसरचे ठाणेदार रामेश्वर पिपरेवार यांनी चोख बंदोबस्त लावला होता.दरम्यान आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार अनिल बावनकर यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली. मद्यस्थी करीत मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यावेळी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत दोन दिवसात बैठक करून तोडगा काढू, असे आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्यात आला. या आंदोलनात अशोक पटले, नितीन लिल्हारे, प्यारेलाल दमाहे, डॉ. सुनील चवळे, सुभाष गायधने, अशोक शरणागत, मुलचंद पटले, भोलाराम पारधी, प्रकाश खराबे, रामू बघेले, नंदलाल लिल्हारे, ईश्वरदयाल गिर्हेपुंजे, श्रीकांत बन्सोड, शैलेश लिल्हारे, झनकलाल दमाहे, तुळशी मोहतुरे, दुर्गाप्रसाद बघेले, भूषण ठाकरे, चंदन लिल्हारे, शिवदास दमाहे, प्रदीप बंधाटे, गणेश दमाहे, शिवदास लिल्हारे, ईश्वर बाेंदरे आदी शेतकरी उपस्थित होते. 

निसर्गामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अशा स्थितीत आपण शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाहीत. बावनथडीचे पाणी योग्य निर्णय घेवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. -राजू कारेमाेरे, आमदार. 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप