लाखांदूर डाक कार्यालयात चोरी

By Admin | Updated: March 29, 2016 00:27 IST2016-03-29T00:27:34+5:302016-03-29T00:27:34+5:30

येथील वर्दळीच्या व मुख्य चौकात असलेल्या पोस्ट आॅफिस कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपयाची रोकड लांबविल्याची घटना सोमवारला सकाळी उघडकीस आली.

Stolen at Lakhandur Post Office | लाखांदूर डाक कार्यालयात चोरी

लाखांदूर डाक कार्यालयात चोरी

लाखांदूर : येथील वर्दळीच्या व मुख्य चौकात असलेल्या पोस्ट आॅफिस कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी ६५ हजार रुपयाची रोकड लांबविल्याची घटना सोमवारला सकाळी उघडकीस आली.
लाखांदूर येथे पोस्ट आॅफीस कार्यालय सुरु झाल्यापासून भाड्याच्या घरातच हे कार्यालय सुरु आहे. शनिवारला कायालयीन कामे आटोपल्यानंतर कार्यालय बंद करुन कर्मचारी निघून गेले. आज सोमवारला कार्यालयात साफसफाई करणारी महिला जेव्हा कार्यालयात सकाळी पोहोचली तेव्हा कार्यालयात चोरी झाल्याचे उघडकीस आले. लगेच कर्मचाऱ्यांना माहिती देऊन पोलिसांना बोलविण्यात आले. पोलीस निरीक्षक देवीदास भोयर यानी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वान पथकाला बोलविले. चोरांचा माग काढण्यात श्वान पथकाला यश आले नाही. घटनास्थळाची पहाणी केली असता मोठी तिजोरी चोरानी तोडून त्यातील ६५ हजार रुपयाची रोकड लांबविल्याचे प्राथमिक निदर्शनास आले. संपुर्ण कार्यालयीन कागदपत्र. पार्सल आणि इतर साहीत्य इतरत्र अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले. नेमकी चोरी शनिवारच्या रात्री झाली की रविवारच्या रात्री हे कळू शकले नाही. मात्र पोलीस चोरीचा कसून तपास करीत आहेत. चोरांनी मागचे दार तोडून कार्यालयात प्रवेश केल्याने चोरी झाल्याचे उशिरा दिसून आले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Stolen at Lakhandur Post Office