रात्रीला साठा, दिवसा पुरवठा!
By Admin | Updated: February 28, 2016 00:48 IST2016-02-28T00:48:34+5:302016-02-28T00:48:34+5:30
मागील अनेक महिन्यापासून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे हा प्रकार वाढत आहे.

रात्रीला साठा, दिवसा पुरवठा!
अड्याळ येथील प्रकार : रिकाम्या जागेवर रेतीचे ढिगारे
अड्याळ : मागील अनेक महिन्यापासून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे हा प्रकार वाढत आहे. ही वाहतूक मध्यरात्री ते पहाटेपर्यंत होत असते. नदीतून आणलेल्या रेतीला मिळेल तिथे रिकाम्या जागेवर साठा करून ठेवणे. दिवसा ज्या ग्राहकाला रेती पाहिजे अशांना पुरवठा करणे हा प्रकार सुरू आहे. एकंदरीत रात्रीला चोरी व दिवसाला साव बनून हा व्यवसाय अड्याळमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
गावात रेतीची वाहतूक रात्रीलाच सुरू आहे. यात प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. यावर येथील अधिकारी, कर्मचारी गप्प का? असा प्रश्न येथीलच सुज्ञ नागरीक करीत आहेत. परंतु यावर कारवाई करण्याचे अधिकार ज्यांना आहेत त्यांनाही या माफियांची भीती तर नसावी ना? असा प्रश्नही विचारला जात आहे. पवनी तालुक्यातील रेतीघाटांवर तस्करीचा हा गोरखधंदा सुरु असून अड्याळमध्ये चारही दिशेला ६ ते ७ कि.मी. अंतररावर रेतीघाट नाही. परंतु गावात खुल्या जागेवर ठिकठिकाणी रेतीचे ढिगारे आहेत.
काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अड्याळला रेती आणली जात आहे. यावर आळा घालण्याची मागणी अड्याळ येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)