उपाध्यक्ष होणार पायउतार
By Admin | Updated: May 11, 2014 00:03 IST2014-05-11T00:03:50+5:302014-05-11T00:03:50+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला सहकार्य केल्याचा ठपका ठेऊन जिल्हा

उपाध्यक्ष होणार पायउतार
भंडारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला सहकार्य केल्याचा ठपका ठेऊन जिल्हा बँकेच्या १६ संचालकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव सहकार विभागाच्या सहआयुक्त यांच्याकडे सादर केला आला आहे. त्यामुळे त्यांचे पदावरुन पायउतार होणे जवळपास निश्चीत मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर या प्रस्तावासंदर्भात बैठक होणार आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदावर विरोधी गटाचे सदाशिव वलथरे यांची निवड करण्यात आली होती. वलथरे हे भाजपचे नाना पटोले यांचे समर्थक मानले जातात. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमदेवार नाना पटोले यांना सहकार्य केल्याचा ठपका ठेऊन बँकेच्या संचालकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. बँकेच्या वाहनांचा दुरुपयोग करणे व अन्य कारणे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहेत. या प्रस्तावावर बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, संचालक कैलास नशिने, नरेंद्र बुरडे, प्रेमसागर गणवीर, विलास वाघाये, विजय खोब्रागडे, विनायक बुरडे, राजू हेडावू, हिराबाई तुमसरे, रुबी चढ्ढा, डॉ.श्रीकांत वैरागडे, रामदयाल पारधी, अशोक मोहरकर, रामलाल चौधरी, होमराज कापगते, रामराव कारेमोरे यांच्या स्वाक्षर्या आहेत. या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सहकार विभागाच्या सहआयुक्त यांच्याकडून जिल्हा उपनिबंधकाची नियुक्ती करण्यात येणार असून लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आटोपल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. (प्रतिनिधी)