ध्येय गाठण्यासाठी जिद्द बाळगा
By Admin | Updated: February 5, 2016 00:37 IST2016-02-05T00:37:30+5:302016-02-05T00:37:30+5:30
जगातील सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. शिक्षण व नोकरीच्या संदर्भात स्पर्धेला फार महत्व आहे.

ध्येय गाठण्यासाठी जिद्द बाळगा
पवनी येथे रौप्य महोत्सव : बंडूभाऊ सावरबांधे यांचे प्रतिपादन
पवनी : जगातील सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. शिक्षण व नोकरीच्या संदर्भात स्पर्धेला फार महत्व आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व प्रयत्नाचे भरवशावर ध्येयाकडे वाटचाल करावयास हवी व ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी असे विचार माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनी व्यक्त केले.
भारत सेवक शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ. आंबेडकर हायस्कूल पवनीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित स्रेहसंमेलनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष गुंडेराव भोगे यांनी भूषविले. आ. अॅड. रामचंद्र अवसरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आ. अवसरे यांनी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक दलितमित्र मन्साराम राऊत यांचे सानिध्यात घत्तलविलेल्या शैक्षणिक काळातील आठवणी सांगून विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक बनन्याचा प्रयत्न करावा, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी भारतसेवक शिक्षण संस्थेचे सचिव विकास राऊत, माजी जि.प. सदस्य अशोक राऊत, माजी पं.स. सदस्य अशफाक पटेल, नगरसेवक धमेंद्र नंदरधने, सेवानिवृत्त नायब तहसिलदार अवनती राऊत, माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, महात्मा फुले विद्यालय मुख्याध्यापक अशोक पारधी, प्रगती पत संस्थेचे अध्यक्ष विजय रायपुरकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माणिक ब्राम्हणकर, नगरसेवक वनिता सयाम, माजी जि.प. सदस्य मोहन पंचभाई, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एम.एस. काणेकर, प्रकश जायस्वाल, मनोहर उरकुडकर, जगदिश वाघमारे, डॉ. भागवत आकरे, इंजि. जगदिश खोब्रागडे, डॉ. आंबेडकर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव भोयर, प्रा. दिपकुमार मेश्राम, प्रगती राऊत यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन एम.पी. रायपूरकर व एम.एच. मोटघरे यांनी प्रास्ताविक मुख्याध्यापक एम.बी. जिभकाटे, अहवाल वाचन ए.एम. धारगावे तर आभार संस्थेचे सचिव विकास राऊत यांनी मानले. उद्घाटक समारंभानंतर रौप्य महोत्सवी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकवर्ग यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)