ठिय्या आंदोलन :
By Admin | Updated: June 18, 2015 00:39 IST2015-06-18T00:39:25+5:302015-06-18T00:39:25+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आयटक प्रणित अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखेच्या ...

ठिय्या आंदोलन :
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आयटक प्रणित अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेत जाणारे रस्त्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने काही काळ परिस्थिती तणावाची होती. गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. चर्चेत आठ दिवसात मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.