वीज बिल माफीसाठी महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:46+5:30

भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील विद्युत बिले नुकतीच पाठविण्यात आली. भरमसाठ बिल आल्याने ही बिले कशी भरावित हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने व उत्पन्न साधन नसल्याने सर्वांचेच हाल अत्यंत वाईट आहेत. अन्नधान्यासाठी पैसा खर्च करावा की विद्युत बिल भरावे, असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. वीज बील भरणे आवाक्याबाहेरचे असून ते अदा करणे अशक्य आहे.

Statement of women to District Collector for electricity bill waiver | वीज बिल माफीसाठी महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वीज बिल माफीसाठी महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनच्या काळातील विद्युत बिल माफ करण्यासाठी जिल्ह्यातील ३३० महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उर्जा मंत्र्यांना पाठविण्यात आले.
या महिलांचे नेतृत्व त्रिवेणी वासनिक यांनी केले. याप्रसंगी कलापती गणविर, सुजाता घोडीचोर, सिलीलता नंदागवळी, त्रिवेणी उपवंशी उपस्थित होत्या. वरठी व भंडारा येथील ३३० महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भंडाराचे मुख्य कार्यकारी अभियंता नंदागवळी यांनाही देण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील विद्युत बिले नुकतीच पाठविण्यात आली. भरमसाठ बिल आल्याने ही बिले कशी भरावित हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने व उत्पन्न साधन नसल्याने सर्वांचेच हाल अत्यंत वाईट आहेत. अन्नधान्यासाठी पैसा खर्च करावा की विद्युत बिल भरावे, असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. वीज बील भरणे आवाक्याबाहेरचे असून ते अदा करणे अशक्य आहे. परिणामी वीज ग्राहकांवर संकट ओढावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतांना हे राज्य सामान्य जनतेचे शेतकºयांचे, कष्टकरांचे आहे असे म्हणतात. दुष्काळाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा कर माफ करुन दिलासा दिला होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सुध्दा शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून लॉकडाऊनच्या काळातील विद्युत बिले माफ करावीत, अशी मागणी निवेदनातून महिलांनी केली आहे.

Web Title: Statement of women to District Collector for electricity bill waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.