बेला येथील विविध समस्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST2021-02-15T04:31:09+5:302021-02-15T04:31:09+5:30

भंडारा : तालुक्यातील बेला येथील नागरिकांनी मूलभूत समस्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के यांच्या नेतृत्वात दिले. यात निवेदन देऊन ...

Statement of various issues at Bella | बेला येथील विविध समस्यांचे निवेदन

बेला येथील विविध समस्यांचे निवेदन

भंडारा : तालुक्यातील बेला येथील नागरिकांनी मूलभूत समस्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के यांच्या नेतृत्वात दिले. यात निवेदन देऊन तक्रारीचे निवारण त्वरित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून सकारात्मक स्वरूपाचे उत्तर मिळाले. समस्यांमध्ये राजीवनगर येथील नालीची समस्या, बौद्ध वाॅर्डातील नालीवर आच्छादन करण्यात यावे, जेणेकरून डासांचे प्रमाण कमी करता येईल, राम मंदिर चौक बेला येथील मधोमध असलेल्या चौकातून शाडिल्य यांच्या घरापर्यंत नालीवर आच्छादन करावे, तसेच परमात्मा भवन मागील परिसरात नालीचे नवीन बांधकाम करावे, अशी मागणी आहे. निवेदन देताना आदर्श युवा मंच अध्यक्ष पवन मस्के, रशीद शेख पटेल, हेमराज भावे, सुधंत ऊके, लुकेश जोध व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Statement of various issues at Bella