समस्यांबाबत भाजप शिक्षक आघाडीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST2021-06-21T04:23:18+5:302021-06-21T04:23:18+5:30
मागील वर्षांपासून अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतनेत्तर अनुदान प्राप्त झाले नाही, त्यामुळे शाळांचे आर्थिक नियोजन कोलमडले ...

समस्यांबाबत भाजप शिक्षक आघाडीचे निवेदन
मागील वर्षांपासून अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतनेत्तर अनुदान प्राप्त झाले नाही, त्यामुळे शाळांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. खूप जास्त पटसंख्या, तुकड्या असलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांमध्ये लिपिक व शिपाई नसल्यामुळे शाळेतील प्रशासनाची मोठी तारांबळ होत असते. त्यामुळे पदांना मंजुरी देण्यात यावी, मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक व प्राथमिक शाळांची संच मान्यता कारण्याची प्रक्रिया थांबलेली आहे. त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत.
या समस्याकडे पक्षातर्फे शासनाचे लक्ष वेधून शालेय शिक्षणाला न्याय द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. याप्रसंगी भाजप शिक्षक आघाडीचे महाराष्ट्रचे सहसंयोजक डॉ.उल्हास फडके, प्रदेश सदस्य मेघश्याम झंजाळ, जिल्हा संयोजक कैलास कुरंजेकर, जीवनदास सार्वे, सुनील ठवरे, महादेव साटोने, घनश्याम तरोणे उपस्थित होते.