शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

राज्य शासनाची खावटी अनुदान योजना फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

सन २०१२ ला बंद झालेली खावटी योजना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, यावर्षी जंगलव्याप्त व दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाजबांधवांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत रोख दोन हजार रुपये कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत, तर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्‍यक वस्तूंचे किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात येते. राज्यातील साडेबारा लाख आदिवासी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : आदिवासी कुटुंबीयांसाठी शासनाने खावटी अनुदान योजनेचा प्रारंभ केला आहे. ही योजना आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. यामुळे आदिवासी समाजबांधवांच्या जीवनात अमूलाग्र बदल होईल. मात्र २०१४ नंतर केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला संपविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. देशाचे संविधान सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. संविधान संपले तर माणुसकी संपेल, लोकशाही संपेल. काँग्रेसने सत्तेचा वापर देशातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता केला. मात्र आपले सरकार हे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन साकोली क्षेत्राचे आमदार तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्यावतीने साकोली तालुक्यातील ग्राम पिटेझरी व मालूटोला गावात खावटी अनुदान वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.  याप्रसंगी कार्यक्रमासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, बीडीसीसी बँकेचे  उपाध्यक्ष  सदाशिव वलथरे, तहसीलदार रमेश कुंभरे, गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष नामदेव  किरसान, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष अशोक कापगते, माजी सभापती रेखा वासनिक, पिटेझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे, मालू टोलाचे सरपंच कृष्णा टेंभुर्णे, उपसरपंच दिनेश कटरे, सुनीता कापगते, अंजिरा चुटे, छाया पटले, दामोदर नेवारे, लीलाधर पटले आदी मंचावर उपस्थित होते. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी, भंडारा जिल्ह्यातील ११७०० आदिवासी कुटुंबीयांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १०,३८४ कुटुंबीयांचे अर्ज वैध ठरले असून त्यांना मंजुरी देऊन सर्व अर्जदारांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये रोख रक्कम जमा करण्यात आल्याचे सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील पात्र आदिवासी कुटुंबीयांना खावटी किट वाटप करून उरलेल्या अर्जाच्या त्रुटी पूर्ण केल्यानंतर त्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकही आदिवासी कुटुंब खावटी अनुदान योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते उपस्थित लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले. संचालन कमलेश सारवे यांनी केले, तर आभार एस. टी. भुसारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी नागरिक, आदिवासी समाजबांधव, आदिवासी कार्यालयातील कर्मचारी  उपस्थित होते. 

२०१२ ची बंद झालेली खावटी योजना सुरू केली- सन २०१२ ला बंद झालेली खावटी योजना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, यावर्षी जंगलव्याप्त व दुर्गम भागात वसलेल्या आदिवासी समाजबांधवांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत रोख दोन हजार रुपये कुटुंबप्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत, तर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्‍यक वस्तूंचे किट लाभार्थ्यांना वाटप करण्यात येते. राज्यातील साडेबारा लाख आदिवासी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासोबतच शासनाने मोहा फुलावरील बंदी उठवली असून त्यावर आधारित उद्योगनिर्मिती करण्याची योजना राबवून जंगलव्याप्त परिसरातील महिला, युवकांना रोजगार देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकही आदिवासी कुटुंब खावटी अनुदान योजनेपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन भंडाराचे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी दिले.

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाNana Patoleनाना पटोले