मुद्रा लोन देण्यास स्टेट बँकेची टाळाटाळ
By Admin | Updated: February 25, 2016 00:31 IST2016-02-25T00:31:58+5:302016-02-25T00:31:58+5:30
स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखेने मुद्रा लोन घेणाऱ्या इच्छुकांना मागील पाच महिन्यापासून टाळाटाळ करीत आहेत.

मुद्रा लोन देण्यास स्टेट बँकेची टाळाटाळ
आजपर्यंत एकालाही लाभ नाही
मोहाडी : स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखेने मुद्रा लोन घेणाऱ्या इच्छुकांना मागील पाच महिन्यापासून टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अर्जदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. कर्ज मिळेल की नाही या विवंचनेत ते सापडले आहेत. मोहाडीतील अन्य बँकांनी मुद्रा योजनेचे कर्ज वाटप केले आहे. मात्र स्टेट बँकेकडून एकालाही कर्ज देण्यात आलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाजावाजा करुन सुरु केलेल्या या योजनेला हरताळ फासला आहे. मुद्रा कर्ज मिळविण्यासाठी मोहाडीतील १५० गरजूंनी स्टेट बँकेत चार महिन्यापूर्वी अर्ज केले. मात्र अर्जदार कर्जाबद्दल विचारण्यास गेल्यास त्यांना टाळाटाळीचे उत्तरे देण्यात येतात. आमच्या बँकेत अनेक कामे असून कर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला कळविण्यात येईल, असे उत्तर देण्यात येते. (शहर प्रतिनिधी)