शेतकऱ्यांना मिळालेले राज्य पुरस्कार हा जिल्ह्याचा बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:01+5:302021-04-02T04:37:01+5:30
यावेळी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, कृषी पर्यवेक्षक योगेश राऊत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, परसोडीच्या कृषी सहायक ...

शेतकऱ्यांना मिळालेले राज्य पुरस्कार हा जिल्ह्याचा बहुमान
यावेळी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, कृषी पर्यवेक्षक योगेश राऊत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, परसोडीच्या कृषी सहायक रेणुका दराडे, कृषिमित्र शाम आकरे, तंमुसचे अध्यक्ष तथा भाजपा तालुका ग्रामीणचे महामंत्री विष्णुदास हटवार व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व उपविभागीय कृषी अधिकारी अधिकारी शांतीलाल गायधने यांच्या हस्ते चिखली येथील सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारप्रसंगी बोलताना तानाजी गायधने यांनी, कृषी विभागाकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच राज्यस्तरापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाल्याने कृषी अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा असल्याचे सांगितले. भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांनी तानाजी गायधने यांचा आदर्श घेऊन सेंद्रिय शेतीसाठी सामूहिक गटशेतीचा प्रयोग राबविण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी कृषी विभागाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
उपविभागीय कृषी अधिकारी शांतीलाल गायधने यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना व त्याचा लाभ देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी आत्माअंतर्गत राबवलेल्या सेंद्रिय शेतीच्या योजनांवर प्रकाश टाकून त्याचे आज पुरस्काराच्या रूपाने फलित मिळाले असल्याचे सांगितले. कृषी सहायक रेणुका दराडे यांनी चिखली गावातील शेतकरी नावीन्यपूर्ण विविध प्रयोग राबवत असल्याचे सांगितले. संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी केले, तर आभार कृषी सहायक रेणुका दराडे यांनी मानले.
बॉक्स
मोहाडी तालुक्यातील नेरी येथील विष्णू आतिलकर यांचाही भंडारा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने
उपविभागीय कृषी अधिकारी शांतीलाल गायधने, मोहाडीचे तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, मंडळ कृषी अधिकारी विजय रामटेके, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भाग्यवान भोयर, कृषी सहायक खेडीकर, अपेक्षा बोरकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी पुरस्कारप्राप्त शेतकरी विष्णू आतिलकर यांनी आपले शेतातील अनुभव कथन केले.