शेतकऱ्यांना दिले अत्याधुनिक रोवणीचे धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:09+5:302021-07-19T04:23:09+5:30
पालांदूर : शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती व्हावी, याकरिता कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रोहिणी भोजराम कठाणे हिने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नासाठी ...

शेतकऱ्यांना दिले अत्याधुनिक रोवणीचे धडे!
पालांदूर : शेतकऱ्यांना नव्या तंत्राची माहिती व्हावी, याकरिता कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी रोहिणी भोजराम कठाणे हिने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नासाठी पट्टा पद्धतीसह इतरही नव्या तंत्राची माहिती थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दिली. चामोर्शी (गडचिरोली) येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय अंतर्गत अंतिम वर्गातील विद्यार्थिनीने विहीरगाव येथे प्रत्यक्ष रोवणीचे प्रात्यक्षिक केले.
शेतकरी पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करीत आहेत. यात थोडासा बदल घडवत कृषी महाविद्यालयाचे अभ्यासातील तांत्रिक बाबीचा नवा अभ्यास शेतकऱ्यांना देण्यात आला. पट्टा पद्धत अंतर मशागतीला अधिक सोयीचे होते. सूर्यप्रकाश सरळ रेषेत प्रकाश करीत असल्याने कीडनाशकाचा त्रास कमी होतो. निंदण, खुरपं, खताची मात्रा देणे, किडीचे निरीक्षण करणे, कीडनाशकाची फवारणी करणे, याकरिता पट्टा पद्धत मौलिक ठरलेली आहे. थेट शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करीत रोहिणी कठाणे या कृषी महाविद्यालय विद्यार्थिनीने शेतकऱ्यांना व शेतमजुरांनासुद्धा अपडेट नवे मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांनासुद्धा कृषीचे नवे तंत्र फायद्याचे वाटले. लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यातील टोलीराम कठाणे राहणार विहीरगाव यांच्या शेतात रोवणीचे प्रात्यक्षिक पार पडले. महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख प्राध्यापक के. डी. गहाणे व टी. के. भांडारकर यांचे मुख्य मार्गदर्शन लाभले.
(फोटो घ्यावा सर जी)