नामांकन भरण्यास उद्यापासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:52+5:30

विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होताच शुक्रवार २७ सप्टेंबरपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

Starting tomorrow to fill the nomination | नामांकन भरण्यास उद्यापासून सुरुवात

नामांकन भरण्यास उद्यापासून सुरुवात

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : तीन मतदार संघ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येत असून या दिनांकापासून म्हणजेच येत्या शुक्रवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन पत्रासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांसाठी एक सूचक आणि इतरांकरिता दहा सूचक आवश्यक आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होताच शुक्रवार २७ सप्टेंबरपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी दाखल करताना सर्वसाधारण उमेदवारासाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये व अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम आहे. या अनामत रकमेसाठी जात प्रमाणपत्रासाठी सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत नमुना २६ मधील प्रतिज्ञालेख द्यावयाचा आहे. हा प्रतिज्ञालेख नोटरी, मॅजीस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा कमीश्नर आॅफ ओथ यांच्यासमक्ष स्वाक्षरी केलेला असला पाहिजे. प्रतिज्ञालेख नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत दाखल करता येईल. उमेदवाराने प्रत्यक्ष शपथ घेणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय, राज्य अथवा इतर नोंदणीकृत पक्षातर्फे उमेदवार उभा असल्यास एबी फॉर्म नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येईल. उमेदवाराला नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर नमुना आठ मध्ये द्विप्रतीत निवडणूक प्रतिनिधीची नेमणूक करता येते. उमेदवारांना तात्पुरते प्रचार कार्यालयासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या आत असे कार्यालय असल्यास त्याठिकाणी प्रचार होता कामा नये. वाहनांची परवानगी विधानसभा मतदारसंघनिहाय संबंधित उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देतील. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील वाहनाची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातून दिली जाईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
 

Web Title: Starting tomorrow to fill the nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.