योगा व प्राणायाम शिबिराला प्रारंभ
By Admin | Updated: June 14, 2017 00:17 IST2017-06-14T00:17:54+5:302017-06-14T00:17:54+5:30
पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबियांचे आरोग्य सुरळीत राहावे,...

योगा व प्राणायाम शिबिराला प्रारंभ
योग सप्ताह शिबिर : पोलीस मुख्यालय पटांगणावर अनेकांची हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबियांचे आरोग्य सुरळीत राहावे, या दृष्टीकोनातून पोलीस मुख्यालय येथील चैतन्य ग्राऊंड येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योगा दररोज सकाळी ५.३० ते ७.३० वाजतापर्यंत नि:शुल्क योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराच्याच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक विनिता साहू होत्या. योगा दिनानिमित्त योगा जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे तसेच पोलीस कुटुंबिय यांच्या दैनंदिन जीवनमान अतिशय ताणतणाव व धकाधकतीचे असून काही कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबियापासून अलिप्त रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य वाढत जाते. ही बाब गंभीर असून कर्मचाऱ्यांचे ताणतणाव कसे घालवता येईल व सकारात्मक दृष्ट्या जीवन आनंदाने कसे जगता येईल, या उद्देशाने व आंतरराष्ट्रीय दिनानिमित्ताने १२ जून ते २१ जूनपर्यंत योग सप्ताह शिबिर राबविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्ताने घेण्यात आलेल्या योगा व प्राणायाम शिबिरात अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, पोलीस उपअधिक्षक गृह भंडारा सुनिल कुलकर्णी, हत्तीमारे, पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश इंगोले, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर, पोलीस निरीक्षक बी.आर. गाडे, पोलीस मुख्यालय येथील मधुकर प्रधान, योग शिक्षिका प्रियांशु पाण्डेय, शाखेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून पोलीस कर्मचाऱ्यांना योगा व प्राणायामाचे धडे दिले जात आहे.
योगा व प्रमाणायमचे महत्व लक्षात घेवून त्यांच्यात मानसिक व शारीरिक बदल घडवून सकारात्मक भावना व जीवन जगण्याची कला अवगत व्हावी, म्हणून योग प्राणायम शिबिर राबविण्यात येत आहे. शिबिर हे सर्वसामान्या करीता उपलब्ध आहे. स्थानिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.