तुमसरच्या मानेकनगर येथे शासकीय कोविड रुग्णालय सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:30+5:302021-05-18T04:36:30+5:30

काही रुग्णांना त्वरित ऑक्सिजन व उपचाराची गरज भासत असल्याने तालुक्यातील रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास विलंब होतो. तसेच बेडची ...

Start Government Kovid Hospital at Maneknagar, Tumsar | तुमसरच्या मानेकनगर येथे शासकीय कोविड रुग्णालय सुरू करा

तुमसरच्या मानेकनगर येथे शासकीय कोविड रुग्णालय सुरू करा

Next

काही रुग्णांना त्वरित ऑक्सिजन व उपचाराची गरज भासत असल्याने तालुक्यातील रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास विलंब होतो. तसेच बेडची कमतरता असल्याने बेडची उपलब्धता निश्चित होऊन उपचारार्थ भरती होईस्तोवर बराच विलंब होऊन रुग्ण दगावण्याच्या प्रमाणात वाढ होत असते. तसेच अनेकदा रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळणे शक्य होत नाही. त्याकरिता तालुक्यात कोरोना रुग्णांना वेळेत ऑक्सिजन व औषधोपचार मिळण्याकरिता कोविड रुग्णालय असणे फार गरजेचे झालेले आहे.

देशभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असून, सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त अनेक गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात बेड व ऑक्सिजन मिळू शकला नाही. त्यामुळे अनेक रुग्ण मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत.

केंद्र सरकारने कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्याने लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सदर कोविड रुग्णालय मानेक नगर ठिकाणी उभारण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे.

Web Title: Start Government Kovid Hospital at Maneknagar, Tumsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.