अतिक्रमण निर्मूलनाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:04 IST2017-12-22T00:03:42+5:302017-12-22T00:04:00+5:30
गाव स्वच्छ आणि सुंदरतेची संकल्पना वास्तवात राबविण्याच्या प्रयत्नांनी पालांदूरची ग्रामपंचायत सरसावली आहे. नालीवरचे अतिक्रमण निर्मूलन करीत अरुंद रस्ते रुंदीकरणाकडे वाटचाल सुरु झाली आहे.

अतिक्रमण निर्मूलनाला प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : गाव स्वच्छ आणि सुंदरतेची संकल्पना वास्तवात राबविण्याच्या प्रयत्नांनी पालांदूरची ग्रामपंचायत सरसावली आहे. नालीवरचे अतिक्रमण निर्मूलन करीत अरुंद रस्ते रुंदीकरणाकडे वाटचाल सुरु झाली आहे.
अतिक्रमण निर्मूलनाचा श्रीगणेशा संजय नगरातून केला असून रस्ता स्वच्छ व मोकळा होत आहे. नागरिकही स्वत:ची जबाबदारी समजत सहकार्य करताना दिसतात. याकरिता सरपंच जितेंद्र कुरेकार, उपसरपंच हेमराज कापसे, ग्रा.पं. सदस्य पुरुषोत्तम भुसारी, ग्रामविकास अधिकारी एच.एम. बावणकर यांनी पुढाकार घेतला आहे. गावातील गटारनाल्या सुद्धा युद्धस्तरावर स्वच्छ केल्या जात आहेत. ग्रामपंचायतची प्राथमिक जबाबदारी झाली तर व्यवस्थीत हाताळली जात असून गावातून कमेटीचे कौतूक होत आहे.
पालांदुरचा मुख्य रस्ता अशाच अतिक्रमणाने वेढला आहे. याला मोकळे करणे ग्रामपंचायतला तारेवरची कसरत करावी लागेल. गावातील इतरही नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचा मानस हेमराज कापसे यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला असलेले खातकुडा हटविणे अगत्याचे आहे. जि.प. हायस्कुल समोरील अस्वच्छता मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले बाजारातील अतिक्रमण निर्मूलनाकरिता खुणावतो आहे. खरच निष्पक्षपणे गावात अतिक्रमण निर्मूलन झाले तर नक्कीच पालांदूर नगरी स्वच्छ व सुंदर व्हायला वेळ लागणार नाही.