शनिवारपासून धान खरेदी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 05:00 AM2020-10-24T05:00:00+5:302020-10-24T05:00:37+5:30

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात धान खरेदी पुर्व तयारी बाबत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी महेंद्र हेडाऊ, उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी उपस्थित होते.

Start buying grain from Saturday | शनिवारपासून धान खरेदी सुरू करा

शनिवारपासून धान खरेदी सुरू करा

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा अध्यक्षांचे निर्देश : केंद्र विभाजन प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण करा, धान खरेदी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात मळणीचा हंगाम जोरात सुरू असून शेतकऱ्यांच्या घरी धान येत आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात एकही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यात शनिवार २४ ऑक्टोबरपासून धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. जिल्ह्यात मंजूर असलेल्या ८४ धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्याची स्पष्ट सूचना त्यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात धान खरेदी पुर्व तयारी बाबत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी महेंद्र हेडाऊ, उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी उपस्थित होते.
गत वर्षी मंजूर असलेल्या जिल्ह्यातील सर्व धान केंद्रावर २४ ऑक्टोंबर पासून धान खरेदी सुरू करावी असे सांगुन ते म्हणाले, धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी ज्या संस्था पुढे येतील व शासनाचे निकष पुर्ण करतील अशा संस्थांना धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे परवानगी देण्यात यावी. ही शेतकऱ्यांची योजना असून निकष पुर्ण करणाऱ्या प्रत्येक संस्थेला केंद्रा उघडण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठी गाव तेथे धान खरेदी केंद्र उघडण्याची आवश्यकता पडल्यास केंद्रास मंजूरी द्यावी, असे निर्देश नाना पटोले यांनी दिले. धान खरेदी करतांना शेतकऱ्यांची लूट होता कामा नये. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी दरवर्षी प्राप्त होत असून ही लूट थांबविण्यात यावी, अशा सुचना त्यांनी पणन विभागाला दिली.
धान खरेदी केंद्र विभाजनाची कार्यवाही १५ दिवसात पुर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या असे त्यांनी सांगितले. नवीन केंद्रांना परवानगी देतांना गावांची सोय बघावी असे ते म्हणाले. योग्य नियोजन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

एकलव्य आश्रम शाळा
नवोदय विद्यालयाच्या धरतीवर असलेली एकलव्य आश्रम शाळा भंडारा जिल्ह्यात उघडण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने शासनाला प्रस्ताव सादर करावा असे निर्देश नाना पटोले यांनी या बैठकीत दिले. जिल्ह्यात आदिवासी समाजाची ९० हजारांच्या जवळपास लोकसंख्या असून एकलव्य आश्रम शाळा उघडण्यासाठी जिल्हा निकषात बसतो. ही बाब लक्षात घेता प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा असे ते म्हणाले. या बैठकीत पेंशनर्स असोशिएशनच्या मागण्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.

Web Title: Start buying grain from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.