संततधार पाऊस; पवनीत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 23:48 IST2017-08-08T23:47:05+5:302017-08-08T23:48:02+5:30

जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस बरसत आहे. या पावसाला जोर नसला तरी पवनी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली आहे.

Stagnant rain; Windy rain | संततधार पाऊस; पवनीत अतिवृष्टी

संततधार पाऊस; पवनीत अतिवृष्टी

ठळक मुद्देजिल्ह्यात २८.१ मि.मी. पावसाची नोंद : शेतकरी सुखावला असला तरी उत्पादनात घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस बरसत आहे. या पावसाला जोर नसला तरी पवनी तालुक्यात मात्र अतिवृष्टी झाली आहे. मागील २४ तासात २८.१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. पवनी तालुक्यात सर्वाधिक ११२ मि.मी. पाऊस बरसला आहे.
पवनी तालुक्यात सर्वाधिक ११२ मि.मी., लाखांदुरा ३९ मि.मी., तुमसरात १५.३ मि.मी., मोहाडीत १२.८ मि.मी., लाखनीत ९.२ मि.मी., भंडाºयात ७.७ मि.मी. तर साकोलीत केवळ ३.४ मि.मी. असा १९९.४ मि.मी. म्हणजे सरासरी २८.१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
धानपीक पाण्याखाली
मासळ : कालपासून परिसरात संततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोवणी केलेले धानपिक व पºहे पाण्याखाली गेल्याने, शेतकºयांपुढे संकट उभे ठाकले आहे. २४ तासात मासळ परिसरात १०९.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
यावर्षी दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत असतानाच अतिवृष्टीने आश्चर्यचकीत केले आहे. या पावसाचा फटका मासळसह संपूर्ण लाखांदूर तालुक्यात बसला. परिसरातील नदी, नाले दुथडी वाहत असून सखल भागात ३ ते ४ फुट पाणी साचले आहे. गावखेड्यातील अनेक छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवाशांची तारांबळ झाली आहे.
मासळ ते किटाडी या रस्त्यावर घोडेझरी तसेच किटाडी जवळील नाल्यावरून ३ ते ४ फुट पाणी वाहत असल्याने त्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. घोडेझरी ते हरदोली वाकल या दरम्यान सोनेगाव समोरील व हरदोली जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने तो मार्ग बंद झालेला आहे. दरम्यान तई गावाजवळून जाणारी चुलबंद नदी दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी ओलांडत आहे. कोणत्याही क्षणी याही मार्गाची वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे. इकडे मासळ बेलाटी कोंढा या मार्गावर सुद्धा ठिकठिकाणी १ ते २ फुट पाणी साचल्याने वाहतूक तुरळक सुरु आहे. मासळ, बाचेवाडी मार्गावरील पुल पाण्याखाली आल्याने रहदारी बंद आहे. दरम्यान मासळ परिसरात अतिवृष्टीमुळे आज शाळा, कॉलेज ओस पडले होते. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांनी सुटी दिली. पावसाने शेतकरी सुखावला असला तरी आजच्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली बुडल्याने उत्पादनात कमालीची घट होण्याची चिन्हे आहे. ज्या शेतकºयांचे पºहे रोवणीविना शेतात होते. तेसुद्धा पाण्याखाली आल्याने शेतकºयांवर चिंतेचे सावट पसरले आहे.
कालव्याची पाळ फुटण्याच्या मार्गावर
कोंढा (कोसरा) : गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे डावा कालवा सोमनाळाजवळ फुटण्याची शक्यता आहे. कालवा फुटल्यास बाजूच्या शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.
पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात पवनी, लाखांदूर तालुक्यात वाहत असलेला गोसेखुर्द प्रकल्पाचा डावा कालवा आहे. पावसाअभावी रोवणी झाली नव्हती. शेतकºयांच्या मागणीनुसार वाही धरण विभागाने डावा कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. डावा कालव्याचे काम मागील तीन वर्षापासून धिम्म्यागतीने सुरू आहे. सोमनाळा गेट क्र. १ च्या पुढे व मागील बाजूस काम पूर्ण झाले नाही. माती काढून पिचिंगचे काम सुरु आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने काम अपूरे असतानाही पाणी सोडावे लागले. परंतु डावा कालवा गेट क्र. १ येथे नियमित कर्मचारी डावा कालवा विभागाने ठेवला नाही. यामुळे कोणीही येतात दरवाजे खुले करतात. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे. गेटमधून पाणी आजूबाजूला वाहत आहे. त्यामुळे डावा कालवा फुटण्याच्या स्थितीत आहे. डावा कालव्याची पार फुटल्यास शेकडो हेक्टर जमीन जलमय होऊ शकते.
पालांदूर परिसरात १४८ मि.मी. पाऊस
पालांदूर : सोमवारला ५६.६ मि.मी. पावसाचे हजेरी लावल्यानंतर मंगळवारला सकाळपासून जोरदार पावसाच्या सरीवर सरी बरसल्या. दुपारी २ पर्यंत पावसाने नदी नाल्या दुथडी भरून वाहू लागल्या. शेतात पाणीच पाणी साचले आहे. विद्यार्थी जाऊ न शकल्याने शाळांना अघोषित सुटी मिळाली. रोवणीच्या कामावर गेलेले मजूर २-३ तासातच घरी परतले. खराशी पुलावर रस्त्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. चालू हंगामातील हा मोठा पाऊस होता. मºहेगावात भारत बेंदवार यांचे घर पडल्याने त्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तहसीलदार राजीव शक्करवार यांनी पालांदूरला भेट देऊन माहिती घेत आहेत.

Web Title: Stagnant rain; Windy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.