शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

निवेदनानुसार देशभरातील महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारांची दारूण समस्या, कामगार कायद्यात मालक-कार्पाेरेट धार्जीनी बदल करणे, खाजगीकरण, कंत्राटीकरणाचा अतेरेकी सपाटा आदी जनविरोधी धोरणे राबविण्याचा सांप्रत केंद्र सरकारने जणू चंग बांधलेला दिसत आहे. त्यामुळे देशातील जनता निराश झाली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागण्यांची पूर्तता करा; राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावे, यासह इतर महत्वाच्या १४ मागण्यांवर लक्षवेध याकरिता महाराष्ट्रातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा ८ जानेवारी २०२० रोजी एक दिवशीय देशव्यापी संपाचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनातून केला आहे.निवेदनानुसार देशभरातील महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारांची दारूण समस्या, कामगार कायद्यात मालक-कार्पाेरेट धार्जीनी बदल करणे, खाजगीकरण, कंत्राटीकरणाचा अतेरेकी सपाटा आदी जनविरोधी धोरणे राबविण्याचा सांप्रत केंद्र सरकारने जणू चंग बांधलेला दिसत आहे. त्यामुळे देशातील जनता निराश झाली. आर्थिक आघाडीवर केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याची भीती प्रत्येक नागरिकांच्या मनात सलत आहे. कामगार, कर्मचारी जगतात. त्यामुळे एक अनामिक भयगंड निर्माण होत आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा, या मागणीसाठी सन २००५ नंतर नियुक्ती झालेले कर्मचारी, शिक्षक आग्रही आहेत. परंतु शासन अद्याप सकारात्मक नाहीत. जानेवारी २०१९ च्या महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै २०१९ पासूनचा पाच टक्क्यांचा महागाई भत्ता अद्याप थकीत आहे. अनुकंपातत्वावरील नोकऱ्यांसाठी निधन पावलेल्या हजारो कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे. पाच दिवसांचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे या सहज शक्य असलेल्या मागण्यांबाबत दिरंगाईचे धोरण राबविले जात आहेत. यासह राज्य व विभागस्तरीय मागण्यांचा विचार होत नसल्याने कर्मचारी नाराज आहेत.शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम येवले, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अतूल वर्मा, सहसचिव जाधवराव साठवणे, सल्लागार गोविंदराव चरडे, उपाध्यक्ष संजय पडोळे, सहकोषाध्यक्ष विशाल तायडे, जिल्हा परिषद समन्वय समितीचे सचिव ताराचंद बोरकर, कृतीशिल निवृत्त अधिकारी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माधवराव फसाटे, राजेश राऊत, दिलीप रोडगे, श्याम राठोड, सुनील मदारकर, ग्रामसेवक युनियनचे विलास खोब्रागडे आदी हजर होते.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन