एस.टी.वर दगडफेक चालकाला मारहाण
By Admin | Updated: November 18, 2014 22:49 IST2014-11-18T22:49:07+5:302014-11-18T22:49:07+5:30
लाखांदूर पवनी मार्गावरील एस.टी. बस विरली थांब्यावर ‘हॉल्टींग’ असल्याने थांबली. रात्रीच्या ९ वाजताच्या सुमारास दोन जणांनी एसटीच्या चालकाला मारहाण करून एस.टी. च्या काचा फोडल्याचा प्रकार घडला

एस.टी.वर दगडफेक चालकाला मारहाण
विरली येथील प्रकार : पोलिसात गुन्हा दाखल
लाखांदूर : लाखांदूर पवनी मार्गावरील एस.टी. बस विरली थांब्यावर ‘हॉल्टींग’ असल्याने थांबली. रात्रीच्या ९ वाजताच्या सुमारास दोन जणांनी एसटीच्या चालकाला मारहाण करून एस.टी. च्या काचा फोडल्याचा प्रकार घडला असून पोलिसात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विरली बु. येथील बसस्थानकावर पवनी लाखांदूर बस दि. १७ चे रात्री हॉल्टींग असल्याने थांबली होती. चालक वाहक दोघेहीजेवण करून विश्राम करीत असताना आरोपी नरेंद्र दयाराम चुटे रा.विरली बु. व इतर एक असे दोघे मिळून जबरदस्तीने एस.टी. चा दार उघडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
ही बाब चालक सतीश पारडे यांच्या लक्षात येताच अटकाव केला असता आरोपीने चालकाला मारहाण केली व एस.टी.वर दगडफेक करून काचा फोडल्या. याच दिवशी विरली बु. येथे मंडई असल्याने लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
अखेर पोलिसात माहिती देऊन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध कलम ३५३, ३३२, ४२७ भादंवि गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल कलेल्या इसमांना अटक झालेली नव्हती. पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष कुंभारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत कुळकर्णी, सहायक पोलीस उपनिरीक्षक वेळीवार तपास करीत आहेत. या घटनेची गाव परिसरात चर्चा होती. (तालुका प्रतिनिधी)