एस.टी. झाडावर आदळली

By Admin | Updated: August 9, 2014 00:46 IST2014-08-09T00:46:15+5:302014-08-09T00:46:15+5:30

भरधाव वेगात असलेल्या बसचालकाचे वळण मार्गावर बसवरुन नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर आदळली. या अपघातात १६ प्रवासी गंभीर जखमी झाले तर २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

S.T. The tree collapsed | एस.टी. झाडावर आदळली

एस.टी. झाडावर आदळली

करडी (पालोरा) : भरधाव वेगात असलेल्या बसचालकाचे वळण मार्गावर बसवरुन नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर आदळली. या अपघातात १६ प्रवासी गंभीर जखमी झाले तर २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना शुक्रवार सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील मोहगाव पुलावरील वळणावर घडली.
तुमसर आगाराची बस क्रमांक एमएच-४०/ए-८६२८ ही चालक भैय्या सार्वे व वाहक अशोक ढबाले हे तुमसर ते मुंढरीसाठी ४.३० वाजता निघाली. मोहगाव (करडी) नाल्यावरील वळणावर पोहचताच बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव बस असल्याने ती झाडावर आदळली. त्यात बसचा समोरील भाग क्षतिग्रस्त झाला. ड्रायव्हरच्या बाजुला बसलेले जीवन गौरीशंकर उरकुडे (२३) या तरूणाचे दोन्ही पाय सिटमध्ये फसल्याने दोन तासाच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. त्याचा एक पाय निकामी झाला.
बसमध्ये तुमसर येथील शारदा कन्या विद्यालय, जनता विद्यालय, राष्ट्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा व प्रवाशी होते.
जखमीमध्ये यामिनी शिंदे, लक्ष्मीकांत शेंडे, बांते, प्रणय कुंभारे, प्रियंका देव्हारे, तनुजा बन्सोड, प्रियंका नेरकर, प्रिती सेलोकर, आयुष निखाडे, चेतन मस्के, अनुप धोटे, वंदना खरवडे, स्वागत खरवडे, संस्कार खरवडे, रुक्साना शेख, प्रियंका बोंदरे, प्रल्हाद गाढवे, रत्नदिप बुराडे, दहिलाल ढेकले, रामेश्वर गोंधुळे, पुजा बांते, करिश्मा बुराडे, माहेश्वरी सोनवाने, युवराज गाढवे, श्रावणी गाढवे, वैष्णवी बांते, रेशमा खोडके, ग्रीष्मा सोनवाने, हर्षा तिजारे, करिश्मा रोटके, लोकेश्वर रोटके, योगेश शेंडे, रामा बुधे, मालती शेंडे, जीवन उरकुडे, बळीराम तराने, पौर्णिमा मस्के, शकील शेख, जश्युम शेख यांचा समावेश आहे. जखमींमध्ये कान्हळगाव, मुंढरी खुर्द, मुंढरी बुज, करडी येथील विद्यार्थी व प्रवाशांचा समावेश आहे.
घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकाने घटनास्थळी धाव घेतली. ट्रक व जेसीबीच्या सहायाने प्रवाशांना बाहेर काढून करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. किरकोळ जखमींना उपचारानंतर सुटी देण्यात आली. काहींना भंडाऱ्याला हलविण्यात आले. घटनेचा तपास मोहाडी पोलीस करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: S.T. The tree collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.