एसटीचा प्रवास सुरक्षित, मग रात्रीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST2021-07-24T04:21:24+5:302021-07-24T04:21:24+5:30

संतोष जाधवर भंडारा : एसटी महामंडळाच्या चालकांसाठी देण्यात येणारी विविध प्रशिक्षणे, गाड्यांची वेळोवेळी होणारी दुरुस्ती, तसेच भंडारा विभागामध्ये नवनवीन ...

ST travel safely, then overnight | एसटीचा प्रवास सुरक्षित, मग रात्रीच्या

एसटीचा प्रवास सुरक्षित, मग रात्रीच्या

संतोष जाधवर

भंडारा : एसटी महामंडळाच्या चालकांसाठी देण्यात येणारी विविध प्रशिक्षणे, गाड्यांची वेळोवेळी होणारी दुरुस्ती, तसेच भंडारा विभागामध्ये नवनवीन गाड्यांचा समावेश झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात अपघातात कमालीची घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सन २०१८ साली ६८ अपघात, २०१९ मध्ये ९२, २०२० मध्ये ५१, तर २०२१ मध्ये अपघाताच्या ०६ घटना भंडारा विभागात घडल्या आहेत. यासाठी एसटीच्या चालकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. खाजगी स्पर्धेत टिकण्यासाठी एसटीतही आमूलाग्र बदल दिवसेंदिवस करण्यात येत आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रवासी क्षमतेत वाढ झाली आहे.

मात्र, असे असले तरी प्रवासी रात्रीच्या प्रवासाला खासगी ट्रॅव्हल्सला प्राधान्य देत आहेत. प्रवाशांना रस्त्यात ताटकळत थांबावे लागू नये यासाठी आता प्रवाशांना एसटीचे लोकेशनही कळते. लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी अनेक जण खासगी बस आधार घेतात. मात्र, आजही महिला विद्यार्थी, वयोवृद्ध, तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी एसटीलाच पहिले प्राधान्य देतात. मात्र, लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल्स कमी थांबा घेतात व जलद गतीने धावत असल्याने वेळेची बचत होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. मात्र, त्या तुलनेत एसटीच्या बस या स्पीडलॉक असल्याने वेळ लागतो, अशी माहिती दिली.

बॉक्स

ट्रॅव्हल्स सुसाट, तर एसटीला स्पीडलॉक...

अपघात रोखण्यासाठी, तसेच वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीला स्पीडलॉक बसविण्यात येते. त्यामुळे एसटीची गती मर्यादित राहून अपघाताला टाळता येते, तर दुसरीकडे ट्रॅव्हल्सच्या गतीला कुठलेही बंधन नसते. त्यामुळे एसटीच्या तुलनेत ट्रॅव्हल्स अतिशय सुसाट धावताना दिसून येतात. मात्र, एसटीप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्सला कुठेही सुरक्षेची हमी नसते.

बाॅक्स

आराम महत्त्वाचा की सुरक्षा...

एसटीचा प्रवास आजही सुरक्षित प्रवास आहे. मात्र, अनेकदा पाहिजेे तिथे एसटी बस थांबत नाही. मात्र, मी नेहमी नागपूर ते भंडारा बसनेच प्रवास करतो.

एसटीने प्रवास करताना वृद्ध प्रवासी, विद्यार्थी यांना तिकीट दरात सवलत मिळते. याउलट खाजगी बसमध्ये ही सुविधा मिळत नाही. शिवाय खाजगी बसमध्ये अरेरावीचे प्रकार घडतात. ग्रामीण भागात आजही एसटीचा अनेकांना दिलासा मिळत आहे.

दीपक आकरे, एसटी प्रवासी

कोट

एसटीचा प्रवास आजही सुरक्षित प्रवास आहे. मात्र, एसटीमध्ये थोडी स्वच्छता वाढविणे गरजेचे आहे. शिवाय एसटी थांबत-थांबत जाते. त्यामुळे वेळ लागतो. दुसरीकडे ट्रॅव्हल्सचा प्रवास कमी वेळात आणि आरामदायी वाटतो.

संदीप हटवार, ट्रॅव्हल्स प्रवासी

कोट

अनुभवी चालक ....

एसटीने प्रवास करणाऱ्या एसटी प्रवाशांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. विमा योजना आहे. बसचा अपघात झाल्यास प्रवाशाला एसटीतर्फे तत्काळ आम्ही मदत करतो. एसटी चालकांना एसटीतर्फे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. वेगावर नियंत्रण राखून प्रवाशांना नेहमीच मदतीसाठी मार्गदर्शन करण्यात येते. एकच वाहक अनेक मार्गांवर वाहन चालवीत असल्याने त्यांचा रस्त्यांचा परिपूर्ण अभ्यास झालेला असतो. त्यामुळे एसटीचा प्रवास हा आजही सुरक्षित प्रवास आहे.

प्रवीण घोल्लर,

अपघात शाखाप्रमुख, भंडारा विभाग

Web Title: ST travel safely, then overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.