एसटीचा टायर फुटला ४० प्रवासी बचावले
By Admin | Updated: May 11, 2014 23:09 IST2014-05-11T23:09:33+5:302014-05-11T23:09:33+5:30
नागपूरहून तुमसरकडे येत असताना एसटी बसच्या समोरील टायर फुटला. यात सुदैवाने एसटीतील ४० प्रवासी सुखरूप बचावले.

एसटीचा टायर फुटला ४० प्रवासी बचावले
तुमसर : नागपूरहून तुमसरकडे येत असताना एसटी बसच्या समोरील टायर फुटला. यात सुदैवाने एसटीतील ४० प्रवासी सुखरूप बचावले. अन्यथा मोठा अपघात घडला असता. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ घडली. एक तासानंतर प्रवाशांना नेण्यासाठी दुसर्या बसची सोय करण्यात आली. नागपूरहून वाराशिवनीकडे जाणारी एसटी बस एमएच ४०-८७८९ ही तुमसर शहरात दाखल होण्यापुर्वीच शहराबाहेरील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ बसचा टायर फुटला. बसमध्ये ४० प्रवासी होते. एसटी चालकाने वेळीच बस नियंत्रणात आणली. अन्यथा बस दुभाजकावर जाऊन आदळली असती. त्यानंतर एक तास प्रवाशांना तेथेच ताटकळत राहावे लागले. सध्या तुमसर आगारातील बसेसच्या अपघातांमध्ये वाढ होत असल्याने कामचुकारपणा दिसून येत आहे. वारंवार होणार्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एसटीच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)