एसटी काढते खड्ड्यातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:40+5:30

जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून भंडारा बसस्थानकाची ओळख आहे. बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. बसस्थानकाच्या उत्तर पूर्व दिशेला कांजीहाऊस आहे. पश्चिम दिशेला भंडारा तुमसर हा राज्यमार्ग आहे.

ST pulls out of the pit | एसटी काढते खड्ड्यातून वाट

एसटी काढते खड्ड्यातून वाट

Next
ठळक मुद्देदुर्गंधीमुळे रहदारीवर परिणाम : राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष

इंद्रपाल कटकवार/संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खड्डेच खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. खड्ड्यातून वाट काढणाºया एसटीकडे खुद्द आगार प्रशासन लक्ष देईल काय, असा प्रश्न विचारला जात आहेत.
जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून भंडारा बसस्थानकाची ओळख आहे. बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. बसस्थानकाच्या उत्तर पूर्व दिशेला कांजीहाऊस आहे. पश्चिम दिशेला भंडारा तुमसर हा राज्यमार्ग आहे. दक्षिण दिशेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल व जलतरण तलावाचा परिसर आहे.
पूर्व दिशेला झोपडपट्टीचा परिसर आहे. नविन बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुना बसस्थानकाच्या परिसरातून मोठ्या बाजारात जाण्यासाठी एक लहान आजही आहे. याच गल्लीतून मोठा बाजार परिसरातून येणारे प्रवासी आजही आवागमन करतात. मात्र या परिसरात दुर्गंधी आहे. कचरा अस्तव्यस्त फेकलेला दिसून येतो. बसस्थानक आवारालगत व्यापारी संकुलाची भव्य इमारत आहे. त्यामुळे जुन्या बसस्थानकाचा भाग खुला असला तरी दाबल्या गेला आहे. शेळ्या, कुत्रे व अन्य बेवारस जनावरे येथे फिरत असतात. बसस्थानकाच्या आवरात खुलेआम लघुशंकेसाठी करण्यासाठी वापर करण्यात येतो. त्यामुळेही दुर्गंधीत वाढ झाली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य प्रमाणात नालीचे बांधकाम नाही. उघड्यावरच लघूशंका केली जात असल्याने प्रवाशांना तोंडावर रुमालच घेवून जावे लागते. स्वच्छता करण्यात येत असली स्थिती ‘जैसे थे’ आहे. बसस्थानक परिसराला लागून असलेल्या इमारती व अन्य दूकानांमधील कचरा कधी-कधी कचरापेटीत न घालता तो थेट जुन्या बसस्थानक परिसरात फेकला जातो. बसस्थानक परिसरातील डांबरीकरण उखडल्याने या समस्येत अजून भर पडली आहे. उखडलेली गिट्टी बसच्या चाकाखाली सापडून केव्हा प्रवाशांच्या अंगावर येईल याचा नेम नाही. गतवर्षी आगार प्रशासनाने मातीचे भरण घालून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशव्दारावरील रस्त्याची वर्षातून अनेकदा डागडूजी करण्यात येते. मात्र समस्या सुटता सुटत नाही. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. दुसरीकडे पास व स्मार्टसाठीही लाभार्थी त्रस्त आहेत.

प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
बसस्थानकात प्रवाशांची नेहमी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकदा 'हात की सफाई' करतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. मात्र त्यांची समस्या सोडविण्यात पोलीसांना यश नाही. येथील पोलीस चौकी नेहमीच कुलुपबंद अवस्थेत दिसून येते. बसस्थानक व आवारात अनेकदा बेवारस साहित्य तासन्तास पडून असते. मात्र त्याची साधी चौकशी केली जात नसल्याचे समजते. कधी-कधी ऐनवेळी बसफेऱ्या रद्द होतात. याची कल्पना प्रवाशांना नसते. याचा फटका अनेकदा बसत असल्याची प्रतिक्रीया ढिवरवाडा येथील ग्रामसेवक गोकुळा सानप यांनी दिली.

बसस्थानक परिसरातील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे अधिकार विभागीय नियंत्रक कार्यालयाला आहे. याबाबत वरिष्ठांना सांगून डागडुजीचे काम सुरु करण्यात येईल.
-सारिका निमजे, बसस्थानक प्रमुख, भंडारा.

Web Title: ST pulls out of the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.