मोहाडी बसस्थानकावर निघाले एसटीचे चाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:11 IST2017-10-28T00:11:20+5:302017-10-28T00:11:32+5:30
तुमसरकडून राजुराकडे जाणाºया एस.टी. बसचे मागील चाक मोहाडी बसस्थानक परिसरात बाहेर निघाले. बस थांबण्याच्यावेळी हा प्रकार घडल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला.

मोहाडी बसस्थानकावर निघाले एसटीचे चाक
सिराज शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तुमसरकडून राजुराकडे जाणाºया एस.टी. बसचे मागील चाक मोहाडी बसस्थानक परिसरात बाहेर निघाले. बस थांबण्याच्यावेळी हा प्रकार घडल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला. या बसमध्ये ५४ प्रवाशी प्रवास करीत होते. ही घटना शुक्रवारला एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकारामुळे घाबरलेले प्रवासी बसमधून उतरले.
तुमसर ते राजुरा ही लांब पल्ल्याची बस आहे. लांब पल्ल्याच्या बसेसची काटेकोर पाहणी करूनच बस सोडण्यात येते. मात्र तुमसर आगाराच्या बस क्रमांक ८७७३ चे मागील चाक अचानक बाहेर निघणे हा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे. धावत्या बसमध्ये हे चाक निघाले असते तर मोठा अनर्थ घडला असता.
तुमसर ते मोहाडी हे अंतर १० कि़मी.चे आहे. ही बस २५० कि़मी. पुढे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरापर्यंत जाणार होती. मोहाडी येथे ही बस पोहचताच मागील चाकाचे संपूर्ण नटबोल्ट खुलून खाली पडून चाक बाहेर निघाले होते. मागे दोन चाके असली तरी दोन्ही चाके एकाच नटबोल्टने कसलेले असतात. त्यामुळे दोन्ही चाके बाहेर निघण्याची शक्यता होती.
ही घटना घडल्यावर आगार व्यवस्थापक नितीन उजवणे हे मोहाडीला येऊन या प्रकाराची माहित जाणून घेतली. त्यानंतर बसची तपासणी करून गंतव्य स्थानाकडे बसला रवाना करण्यात आले.
संपूर्ण तपासणी केल्यावरच बस सोडण्यात येते. नटबोल्ट निघाल्याने चाक बाहेर आले. मी स्वत: तिथे जाऊन चौकशी केली व त्या बसला पुढच्या प्रवासाकरिता पाठविण्यात आले.
-नितीन उजवणे, बसडेपो व्यवस्थापक, तुमसर.