योजना गोर-गरिबांपर्यंत पोहोचवा

By Admin | Updated: March 1, 2017 00:33 IST2017-03-01T00:33:34+5:302017-03-01T00:33:34+5:30

भारतीय जनता पक्षाचे केद्रात व राज्यात सरकार असून देशातील गोर-गरीब लोकांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत.

Spread the plan to Gore-Poorib | योजना गोर-गरिबांपर्यंत पोहोचवा

योजना गोर-गरिबांपर्यंत पोहोचवा

नाना पटोले यांचे आवाहन : लाखनीत जनता दरबारचे आयोजन
लाखनी : भारतीय जनता पक्षाचे केद्रात व राज्यात सरकार असून देशातील गोर-गरीब लोकांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत. या योजनाचा लाभ गोरगरीबांना मिळवून देण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य करावे असे आवाहन लाखीन येथे २७ फेब्रुवारीला आयोजित जनता दरबारात बोलतांना खा. नाना पटोले यांनी केले.
लाखनी येथील संताजी मंगल कार्यालयात २७ फेब्रुवारीला जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात शेतातील धान पिकाला व ऊस पिकाला १६ तास वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांनी मागणी उचलून धरली. सध्या ८ ते १२ तास वीज पुरवठा होत असून लवकरच १६ तासापर्यंत कृषीपंपाना वीज पुरवठा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणी करुन तोडगा काढला जाईल असे आश्वासन खा. नाना पटोले यांनी दिले.
वीजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नवे सबस्टेशन, नवे जनित्र बसविण्यासाठी महावितरणकडे प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्युत दाब कमी अधिक झाल्यास कृषी पंप जळून शेतकऱ्यांचे नुकसान होत असते. हे नुकसान होणारनाही याची काळजी घेणे महावितरणचे काम आहे असेही ते म्हणाले. एका शेतकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना खा. पटोले यांनी सध्या नव्याने गोसे प्रकल्पात शेतजमिनी गेल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यास केंद्र शासनाच्या नव्या धोरणानुसार पाच पट रक्कम मिळेल परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी केंद्र शासनाच्या धोरणापूर्वी गोसे प्रकल्पाअंतर्गत हस्तगत करण्यात आल्या. त्यांना जुन्या धोरणानुसार रक्कम मिळणार असल्याचे स्पष्ट केले. निराधार योजनेच्या नावावर खोटे दस्तावेज तयार करुन आर्थिक सहाय्यता घेतली जाते. खऱ्या लाभार्थींना निश्चित लाभ मिळावा. मात्र यातील नकली लाभार्थीचा शोध घेतला पाहिजे.
या जनता दरबाराला खा. नाना पटोले, आ. राजेश काशीवार, सभापती विनायक बुरडे, आत्राम, उपसभापती विजय कापसे, जि.प. सदस्य आकाश कोरे, खविसचे संचालक मनिराम बोळणे, निंबेकर, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर प्रामुख्याने उपस्थित होते.
वन जमिनीचे पट्टे मिळावे, व्यसनमुक्ती व दारुबंदी व्हावी आदी मागण्या ग्रामस्थांनी कुटूंब सहायता योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचा चेक विधवा महिलांना खा. पटोले, आ. काशिवार यांच्या हस्ते देण्यात आला. जनता दरबारात अधिकारी, कर्मचारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Spread the plan to Gore-Poorib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.