सेंट मेरीस शाळेत क्रीडा सप्ताह

By Admin | Updated: January 13, 2017 00:19 IST2017-01-13T00:19:19+5:302017-01-13T00:19:19+5:30

स्वस्थ शरीरात स्वस्थ मन निवास करते त्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांच्यामध्ये खेळाविषयी आवड,

Sports Week in Saint Mary's School | सेंट मेरीस शाळेत क्रीडा सप्ताह

सेंट मेरीस शाळेत क्रीडा सप्ताह

भंडारा : स्वस्थ शरीरात स्वस्थ मन निवास करते त्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांच्यामध्ये खेळाविषयी आवड, आदर निर्माण करणे हाच देतु लक्षात घेवुन सेंट मेरिस शाळेत क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.
या क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ आदरणीय आर. टी.ओ. काळे, गोकुळे, राऊत तथा धुर्वे तसेच शाळेचे संचालक, बेबी थॉमस, शिजो थॉमस व शाळेच्या मुख्याध्यापिका नरगिस काजी यांच्या उपस्थितीत मध्ये करण्यात आला.
शाळेची विद्यार्थीनी मृण्मयी बोरकर व विद्यार्थी अलय भैसारे यांनी मशाल प्रज्वलित करुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी शाळेच्या विभिन्न हाऊसद्वारे मार्च पास्ट करण्यात आली. शाळेच्या ध्वजाचे प्रतिनिधीत्व शाळेच्या विद्यार्थी संघटनेचे खेळ प्रतिनिधी प्रणय धुर्वे, स्काऊट गाइडचे प्रतिनिधी किर्ती जांभुळकर तसेच रेड, ग्रीन, येलो व ब्लू हाऊसच्या प्रतिनिधीनी आपल्या हाऊसचे ध्वज उंचावून या कार्यक्रमामध्ये प्रस्तुत बॅन्ड व संगीताने अदभुत वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमामध्ये चवथी, पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक ड्रील प्रस्तुत केली. तसेच सहावी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पिरॅमिडचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा आरंभ मुख्याध्यापिका नरगिस काजी यांनी उत्साहपुर्ण भाषणाद्वारे केला. पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत यांनी विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांची महत्वपूर्ण माहिती , जीवनावश्यक नियमांची सुरक्षतेसंबंधी माहिती दिली. सोबतच शुभेच्छा सुध्दा दिल्या. धुर्वे यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक कार्यक्रम प्रस्तुत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे संचालक बेबी थॉमस, शिजो थॉमस व मुख्याध्यापिका नरसिंग काजी यांनी शाळेच्या खेळ प्रशिक्षीका दुर्गा शर्मा आणि खेळ प्रशिक्षक अब्दुल जुबेर यांना करण्यात आलेल्या सहकार्य साठी प्रशंसा केली. (प्रतिनिधी)

Web Title: Sports Week in Saint Mary's School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.