निरोगी राहण्यासाठी खेळ सर्वोत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:34 IST2021-02-13T04:34:30+5:302021-02-13T04:34:30+5:30

भंडारा तालुक्यातील परसोडी येथील मुन्नाभाऊ क्रिकेट क्लब परसोडीच्या वतीने आयोजित टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

Sports are the best way to stay healthy | निरोगी राहण्यासाठी खेळ सर्वोत्तम

निरोगी राहण्यासाठी खेळ सर्वोत्तम

भंडारा तालुक्यातील परसोडी येथील मुन्नाभाऊ क्रिकेट क्लब परसोडीच्या वतीने आयोजित टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी अनिल कळंबे हे होते. तर प्रमुख पाहुणे माजी सभापती राजकपूर राऊत, शिवाजी लेझीम ग्रुप ठाणाचे कल्याणी निखाडे, भाजपचे तालुका महामंत्री विष्णूदास हटवार, आशिष हटवार, राजेश वाघमारे, चंद्रभान कारेमोरे, मुन्नाभाऊ भोंगाडे, धनराज राखे, तंटामुक्ती अध्यक्ष मोतीलाल येळणे, सरपंच परसोडी कल्पना मोटघरे, रज्जाक शेख, परसोडीचे माजी उपसरपंच दर्शन फंदे ,ग्रा. पं. सदस्य थापा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भाजपा तालुका महामंत्री विष्णूदास हटवार यांनी खेळ खेळल्यास फक्त शरीरच निरोगी राहत नाही तर नेतृत्वगुण वाढीस लागतो. याशिवाय प्रत्येकालाच मदत करण्याची सवयही खेळाडूंमध्ये निर्माण होते. त्यामुळे हार, जीत या भावनेतून खेळाकडे न पाहता खिलाडू वृत्तीने पाहण्याची गरज आहे असे सांगितले. याप्रसंगी कल्याणी निखाडे यांनी स्पर्धेचे परंपरा कायम राखून खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा व संधी कशा मिळतील, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Sports are the best way to stay healthy