पालिकेच्या जागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: June 24, 2015 01:11 IST2015-06-24T01:11:35+5:302015-06-24T01:11:35+5:30

स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याकरिता मुख्य बाजार पेठेतील व्यापारी तसेच शहरवासीयांनी पालिकाला सहकार्य करण्यासंदर्भात ....

Spontaneous response to the school's awareness rally | पालिकेच्या जागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालिकेच्या जागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

तुमसर : स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याकरिता मुख्य बाजार पेठेतील व्यापारी तसेच शहरवासीयांनी पालिकाला सहकार्य करण्यासंदर्भात जागृती रॅलीचे आयोजन केले असता शहरातील प्रतिष्ठीत नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या संख्येनी सहभाग नोंदविला.
शहराला क्लिन अमड ग्रीन सिटी बनविण्याकरिता उपाययोजना आखून त्या दिशेने निवेदने तयार करण्यात येऊन मुख्य बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी त्यांना ठराविक जागेत व्यापार करावा दुकानाबाहेर तसेच रस्त्यावर सामान न ठेवणे, दुकानाचे फलक रस्त्यावर न लटकविणे, दुकानातील केर कचरा रस्त्यावर न फेकणे किंवा नाल्यामध्ये न घालता कचरा कुंडीत घालणे व जमा झालेला केरकचरा नगर पालिकेच्या घंटागाडीत टाकणे तसेच रहिवासी यांनी देखील घरासमोरील नालीत किंवा खुल्या परिसरात कचरा न घालता घरासमोर कचरा कुंडी ठेवून त्यातच कचरा जमा करणे, पालिकेच्या घंटा गाडीत कचरा घालणे या बाबतचे निवेदन मुख्य बाजारपेठेसह संपूर्ण शहरात भ्रमण करून निवेदन देण्यात आली. पाच दिवसातही सुधारणा होत नसेल तर नगर पालिकेने जप्तीपथक तयार केलेला असून व्यापाऱ्यांचे साहित्य रस्त्यावर दिसल्यास साहित्याची जप्तीही होणार असून जप्ती टाळण्यासाठी कुणीही राजकीय दबाव न आणता सहकार्य करण्यासंदर्भात पाच दिवसाआधीच रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी माहिती दिली. या रॅलीत जे.सी.आय., लॉयन्स क्लब, व्यापारी संघटना, नगरसेवक, मुख्याधिकाऱ्यासह पालिकेचे संपूर्ण कर्मचारी न.प. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शहरातील सर्व राजकीय पक्षाचे नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने रॅली चर्चेचा विषय ठरली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Spontaneous response to the school's awareness rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.