सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:48 AM2019-09-10T00:48:10+5:302019-09-10T00:48:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पहेला : सामान्य परीक्षा समितीच्या माध्यमाने गांधी विद्यालय शिक्षण संस्थांतर्गत सहाही शाळांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी ...

Spontaneous response to common sense competition exams | सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next
ठळक मुद्दे४०० विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तीन गटात विभाजन

लोकमत न्यूज नेटवर्क
पहेला : सामान्य परीक्षा समितीच्या माध्यमाने गांधी विद्यालय शिक्षण संस्थांतर्गत सहाही शाळांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी चार हजार विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा दिली. दरवर्षी केवळ एकच परीक्षा घेतल्या जायची. परंतु यावर्षीपासून काही महिन्याच्या अंतराने चार परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा झपाट्याने वाढत आहेण आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थी फार मागे असलेला पहायला मिळतो. हा ग्रामीण विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत मागे राहू नये. त्यांची शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, या दृष्टीने गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.आनंद जिभकाटे व व्यवस्थापक मंडळ यांच्या दूरदृष्टी कल्पकतेतून सामान्य परीक्षा मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळातर्फे गत दहा वर्षापासून दरवर्षी नि:शुल्क विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेतली जाते.
सामान्य परीक्षा समितीचे सचिव प्राचार्य डी.एस. चेटुले व प्रा.एस.व्ही. गोंडाणे यांनी या सर्व परीक्षांचे नियोजन तयार केलेले आहे. यासाठी ५ ते १२ वी पर्यंत शिकविणारे विषय शिक्षक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे सहकार्य घेण्यात आले. अंतिम परीक्षेचे मुल्यमापन झाल्यानंतर प्रतिभावंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या स्तरावरून गौरविण्यात येणार आहे.
सामान्य परीक्षा समितीच्या माध्यमाने आयोजित परीक्षेसाठी संस्थाअंतर्गत सहाही शाळांचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केलेत. विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी पडणाऱ्या नाविण्यपूर्ण स्पर्धा परीक्षा गांधी विद्यालय शिक्षण संस्थेतील शाळांमध्ये उत्कृष्टपणे राबविल्या जातात. यांचा परिसरातील पालकांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामीण भागातील पिढी प्रज्ञावंत व्हावी, स्पर्धेच्या युगात त्यांचा टिकाव लागावा. स्पर्धा परीक्षेचे विविध प्रश्न व त्यांचे स्वरुप याची विद्यार्थी दशेतच जाणीव व्हावी, या हेतूने दरवर्षी ही परीक्षा राबवितो. यावर्षी मात्र या परीक्षेचे स्वरुप बदलविले असून याद्वारे प्रतिभावंतच विद्यार्थी पुढे येतील, यशाचे मानकरी ठरतील अशी आशा आहे.
-अ‍ॅड.आनंद जिभकाटे, अध्यक्ष, गांधी विद्यालय, शिक्षण संस्था, कोंढा.

Web Title: Spontaneous response to common sense competition exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक