‘भंडारा बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: March 20, 2015 00:36 IST2015-03-20T00:34:46+5:302015-03-20T00:36:26+5:30
फेसबुकवर झालेली कामेंट. त्यानंतर संतप्त लोकांनी केलेली तरुणाला मारहाण याप्रकरणात पोलिसांनी तातडीने पाऊल उचलले नसल्याचा आरोप करुन पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ ..

‘भंडारा बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
भंडारा : फेसबुकवर झालेली कामेंट. त्यानंतर संतप्त लोकांनी केलेली तरुणाला मारहाण याप्रकरणात पोलिसांनी तातडीने पाऊल उचलले नसल्याचा आरोप करुन पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व हिंदू रक्षा मंचने आज (गुरूवारी) पुकारलेल्या भंडारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये व महत्वपूर्ण सेवा वगळता व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. पोलिसांचा ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दि. १९ मार्च ला व्यापारी प्रतिष्ठाणे बंद ठेऊन प्रशासनाचा निषेध करावा असे आवाहन या संघटनांमार्फत करण्यात आले होते. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी स्वंयस्फूर्तीने सहभाग नोंदविला. मुख्य मार्गावरील दुकानांसह शहरातील बाजारपेठ पुर्णत: बंद होती.
शहरातील मुख्य बसस्थानक परिसरातही दुपारपर्यंत शुकशुकाट जाणवला. परिक्षांचा कालावधी असल्याने शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहतील असेही या संघटनांनी कळविले होते. त्यानुसार शाळा, महाविद्यालये व अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होत्या.
संघटनांच्या आवाहनानंतर भंडारा वासियांसह व्यापाऱ्यांनी या बंदला स्वयंस्फूर्तीने पाठींबा दिल्याचे जाणवले.
या प्रकरणात पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आल्याचे संघटनाचे म्हणणे आहे. याप्रकरणी प्रशासनाने दोषींवर योग्य व कडक कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. या घटनेकडे शहरवासींयाचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)