अणुऊर्जा प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:43 IST2019-01-19T21:42:57+5:302019-01-19T21:43:22+5:30
येथील जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात१८ व १९ जानेवारीला भाभा परमाणू संशोधन केंद्र (बार्क) मुंबईतर्फे ‘अणुउर्जा : भविष्याची शिल्पकार’ या विषयावर बार्कच्या माध्यम संबंध व जनजागृती विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय प्रदर्शन व चर्चासत्राचे उद्घाटन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

अणुऊर्जा प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात१८ व १९ जानेवारीला भाभा परमाणू संशोधन केंद्र (बार्क) मुंबईतर्फे ‘अणुउर्जा : भविष्याची शिल्पकार’ या विषयावर बार्कच्या माध्यम संबंध व जनजागृती विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय प्रदर्शन व चर्चासत्राचे उद्घाटन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला भाभा आण्विक संशोधन केंद्राचे माध्यमसंबंध व जनजागृती विभागाचे प्रमुख डॉ.आर.के. सिंग व भाभाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.एस.व्ही. ठाकरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. महाविद्यालयाच्या वतीने पाहुण्यांना स्मृतीचिन्ह बहाल करण्यात आले. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी आयोजित अणुउर्जा प्रदर्शनीला भेट देवून पाहणी केली. जिल्हाधिकाºयांनी उत्कृष्ट आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासनाची प्रशंसा केली. वैज्ञानिक दृष्टीकोण रूजविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन व जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादीत केले. याप्रसंगी भाभा आण्विक संशोधन केंद्राचे माध्यमसंबंध व जनजागृती विभाग प्रमुख डॉ.आर.के. सिंग यांनी भाभा आण्विक संशोधन केंद्राच्या राष्ट्रव्यापी महान कार्याचा उल्लेख केला व विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आधुनिक युगात अणूउर्जेचा सुरक्षित वापर करणे क्रमप्राप्त आहे व मानवतेच्या कल्याणासाठी अणूउर्जेचा वापर करण्याच्या क्षेत्रात आपला देश अग्रेसर असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांनी भारताच्या प्राचीन काळापासूनच्या गौरवशाली वैज्ञानिक योगदानाचा उल्लेख केला व वैज्ञानिक दृष्टीकोण व तर्कसंगत विचार संस्कृती हे विज्ञाननिष्ठ समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी व रूजविण्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.
जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या आयक्युएसीचे समन्वयक डॉ.कार्तिक पनीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर सायन्स फोरमचे समन्वयक डॉ.सलील बोरकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.उमेश बन्सोड, डॉ.अपर्णा यादव व डॉ.पद्मावती राव यांनी केले. कार्यक्रमाला पत्रकार, प्राध्यापक, विद्यार्थी व सन्माननीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शन व कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक बार्कचे सहयोगी कर्मचारी, विद्यार्थी, महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी संजय मेश्राम, मनोहर पोटफोडे यांचे सहकार्य लाभले.