शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण १६० कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ४९ कोटी १७ लाख व आदिवासी उपयोजना (क्षेत्रबाह्य ) १० कोटी २२ लाख ३२ हजार, अशी एकूण २१९ कोटी ३९ लाख ३२ हजार अर्थसंकल्पीय तरतूद होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, विविध विभागाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी सर्व साधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्र बाह्य या योजनांची अंमलबजावणी तातडीने करून यंत्रणांनी प्राप्त निधी वेळेत खर्च करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले.जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, सहायक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण १६० कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ४९ कोटी १७ लाख व आदिवासी उपयोजना (क्षेत्रबाह्य ) १० कोटी २२ लाख ३२ हजार, अशी एकूण २१९ कोटी ३९ लाख ३२ हजार अर्थसंकल्पीय तरतूद होती.जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन यांनी योजना राबवितांना व लाभार्थी यादी अंतिम करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कुठल्याही परिस्थितीत कामाच्या गुणवत्तेत तडजोड करता कामा नये असे त्यांनी सांगितले.योजनेच्या निधीमधून साहित्य खरेदी करावयाची असल्यास १५ फेब्रुवारीपूर्वी खरेदी प्रक्रिया पार पाडावी, असे ते म्हणाले. प्रशासकीय मान्यता घेणे बाकी असल्यास तत्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे, निधीची बचत असल्यास यंत्रणांनी लेखी प्रस्ताव नियोजन अधिकारी यांना सादर करावा. अनेक यंत्रणांनी उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले नाही ते सुध्दा तातडीने सादर करण्यात यावे, नावीन्यपूर्ण व पुनर्विनियोजनासाठी निधीची मागणी असल्यास आठ दिवसात सादर करावी. प्राप्त निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असेल असे सांगितले.या बैठकीत कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूरनियंत्रण, गृह, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य सेवा, सामान्य आर्थिक सेवा, नाविन्यपूर्ण योजना, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यासह विविध योजनेच्या  खर्चाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी