वेग नियंत्रक केवळ प्रमाणपत्रासाठीच

By Admin | Updated: June 29, 2015 00:53 IST2015-06-29T00:53:17+5:302015-06-29T00:53:17+5:30

चालकाचे आसनाचे क्षेत्र स्वतंत्र असावे,...

The speed controller is for certificate only | वेग नियंत्रक केवळ प्रमाणपत्रासाठीच

वेग नियंत्रक केवळ प्रमाणपत्रासाठीच

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास : यंत्राशी करतात छेडछाड, अनधिकृत वाहनांचा वापर
भंडारा : चालकाचे आसनाचे क्षेत्र स्वतंत्र असावे, सुसज्ज प्रथमोपचार पेटी व आयएसआय मार्क असलेली एबीसी प्रकाराची अग्निशमन उपकरणे असण्याच्या नियमांना तर हरताळ फासल्याचे दिसून येते.
धक्कादायक म्हणजे, शहरात व्हॅनची वेगमर्यादा ४० कि.मी. प्रति तासापेक्षा असायला नको; यासाठी वेग नियंत्रक (स्पीड गव्हर्नर) लावणे बंधनकारक असताना अनेक चालक वेग नियंत्रक केवळ ‘फिटनेस सर्टिफिकेट’ घेण्यापुरतेच बसवीत असल्याची माहिती आहे.
परिणामी, विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेल्या या बेलगाम स्कूल व्हॅनवर अपघात झाल्यावरच लगाम लागणार का? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)

पालकांनी अनधिकृत स्कूल बसेस टाळाव्यात
आरटीओच्यावतीने वेळोवेळी स्कूल बस व व्हॅनची तपासणी केली जाते. पालकांनी अनधिकृत बसमध्ये पाल्यांना शाळेत पाठवू नये. त्यांच्या घर परिसरात स्कूल बस येत नसल्यास शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधून बसची मागणी करावी. १ जुलैपासून शहरातील स्कूल बस व आॅटोंच्या तपासणीची मोहीम राबविण्यात येणार आहे. स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनच्या फिटनेस व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत असल्यास पालकांनी आरटीओकडे तक्रार करणे अपेक्षित आहे.
- अतुल आदे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा

वेगमर्यादा ४० ऐवजी ५० वर
स्कूल व्हॅनच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी स्कूल व्हॅनचा वेग ४० तर हद्दीच्या बाहेर ५० किलोमीटर प्रतितासाची मर्यादा निश्चित केली आहे. १ मे २०१२ पासून सर्व स्कूल व्हॅन्सना वेग नियंत्रक बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. तशी अधिसूचनाही आहे. वेग नियंत्रक हे मान्यताप्राप्त संस्थेने मान्य केलेले असावे, असा नियम आहे. वेगनियंत्रक बसवल्यानंतर त्याची तपासणी मोटार वाहन निरीक्षक करतात. त्याला सील लावतात आणि नंतरच वाहन योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्र देतात. जिल्ह्यात १४७ स्कूल बसेस आहेत. यातील १४२ बसेसला स्पीड गव्हर्नर लावण्यात आले आहेत. उर्वरित पाच बसेला स्पीड गव्हर्नर नसल्याची बाब समोर आली आहे.
यात या यंत्राशी छेडछाड करणे व्हॅन मालकाला परडवणारे नाही. या यंत्रात वेगाला प्रतिबंध करणारी सिस्टिम सहज काढून घेण्यासारखे आहे. यामुळे अनेक चालक याचा फायदा घेत वाहन धूम पळवित आहेत.

Web Title: The speed controller is for certificate only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.