अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला वेग
By Admin | Updated: October 21, 2014 22:46 IST2014-10-21T22:46:19+5:302014-10-21T22:46:19+5:30
खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. त्यांच्या समायोजन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेला वेग
मोहाडी : खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. त्यांच्या समायोजन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
भंडारा जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळेत बरेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया विधानसभा निवडणुकीनंतर होणार, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्या अनुषंगाने खाजगी अनुदानित माध्यमिक अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे समायोजनाबाबत २८ आॅक्टोबर रोजी व २९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे समायोजन संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) के.झेड. शेंडे यांनी दिली असून या समायोजन शिबिराला अतिरिक्त करण्यात आलेले शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मुख्याध्यापकांना उपस्थित राहायचे आहे.
भंडारा जिल्ह्यात खाजगी शाळेचे ८६ शिक्षक व १३१ शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. त्यापैकी प्रत्येकी ८६ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन रिक्त असलेल्या खाजगी शाळेत केले जाणार आहेत. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन होवूनही आनखी ४५ शिक्षेकेत्तर कर्मचारी त्याच पदस्थानी राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांच्या समायोजन करण्याची कार्यवाही जोमात सुरू आहे. या समायोजनात कोण कुठे जाणार याची उत्सुकता लागली आहे. ज्या शाळेत रिक्त जागा आहेत. (तालुका प्रतिनिधी)