ज्येष्ठांसाठी सामान्य रूग्णालयात विशेष रूग्णसेवा
By Admin | Updated: October 1, 2014 23:17 IST2014-10-01T23:17:46+5:302014-10-01T23:17:46+5:30
मागील काही वर्षात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे नागरिकांना आरोग्याची उत्तम सुविधा मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी

ज्येष्ठांसाठी सामान्य रूग्णालयात विशेष रूग्णसेवा
भंडारा : मागील काही वर्षात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे नागरिकांना आरोग्याची उत्तम सुविधा मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे यांनी केले.
जिल्हा सामान्य रूग्णालयात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय वयस्क सुश्रुषा कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, समाजकल्याण सहायक आयुक्त धारगावे, डॉ. धकाते, डॉ. बढे, डॉ. रवींद्र वानखेडे, डॉ. कांबळे, स्वातंत्र्य संग्राम सैनिक शत्रुघ्न नागलवाडे उपसिथत होते.
यावेळी ते म्हणाले, ज्येष्ठांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. युवक व युवतींच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करून आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. शासनाने ज्येष्ठांसह सर्वसामन्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. त्याचा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहचला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात १० खाटांची सुविधा मिळावी, यासाठी प्रस्ताव बनविण्यात आला आहे. ज्येष्ठांना दातांची समस्या असल्यामुळे त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्येष्ठांसाठी एमडी डॉक्टरांची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी, ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात प्रकृतीच्या अडचणी येतात. त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष न करता व्याधीमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा व ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात सुरू करण्यात आलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
(शहर प्रतिनिधी)