मानवी जीवनात खेळांचा विशेष महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:28+5:302021-03-06T04:33:28+5:30

याप्रसंगी पाहणी दरम्यान त्यांच्या सोबत तालुका क्रीडा मार्गदर्शक शाहीर कुरैशी, प्रभू संग्रामे यांनी तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे जिल्हा क्रीडा ...

The special importance of sports in human life | मानवी जीवनात खेळांचा विशेष महत्त्व

मानवी जीवनात खेळांचा विशेष महत्त्व

याप्रसंगी पाहणी दरम्यान त्यांच्या सोबत तालुका क्रीडा मार्गदर्शक शाहीर कुरैशी, प्रभू संग्रामे यांनी तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांचा सत्कार केला.

याप्रसंगी क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराम चौधरी, मंगेश गुधडे यांच्यासह तालुक्यातील खेळाडू तसेच पालक उपस्थित होते. साकोली क्रीडा संकुल भेटी अंतर्गत उडण, बॅडमिंटन हॉल, कार्यालय, जीम, हॉलीबॉल सेंटर, ओपन जीम, धावपथक या सर्वांची जिल्हा क्रीडाधिकारी सबनीस यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांनी खेळाडूंना कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावात काळजी घेऊन खेळाकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबत मार्गदर्शन केले.

यासोबतच त्यांनी शरीराला व्यायामाची गरज असून नियमित सराव सुरू ठेवण्याबाबत आवाहन केले. यावेळी त्यांनी परिसरातील स्वच्छता करून दैनंदिन स्वच्छतेचे आवाहन केले. यावेळी तालुका क्रीडा मार्गदर्शक शाहीद कुरैशी यांनी साकोली तालुक्याला उत्कृष्ट खेळाडूची परंपरा लाभली असल्याचे सांगितले. यावेळी खेळाडूंसाठी तालुका क्रीडा संकुलाला विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी सबनीस यांच्याशी चर्चा केली.

यावेळी त्यांच्यासोबत साकोली येथील क्रीडा शिक्षक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

बॉक्स

खेळामध्ये सातत्य आवश्यक

खेळ ही सातत्यपूर्ण सरावाची गोष्ट आहे. यामध्ये यश, अपयश महत्त्वाचे नसून खेळाडूने खिलाडू वृत्तीने खेळाकडे पाहण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत सर्वांनीच आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी व्यायाम, खेळ खेळण्याची गरज आहे.

Web Title: The special importance of sports in human life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.