सभापती वैद्य, उपसभापती काटेखाये
By Admin | Updated: September 30, 2015 00:51 IST2015-09-30T00:51:32+5:302015-09-30T00:51:32+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज मंगळवारी घेण्यात आली.

सभापती वैद्य, उपसभापती काटेखाये
पवनीत : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक
पवनी : कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज मंगळवारी घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोमेश वैद्य यांची सभापतीपदी तर कुंडलीक काटेखाये यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलचे ११ तर शेतकरी पॅनलचे ७ संचालक निवडून आले होते. नशीब आजमाविण्यासाठी राष्ट्रवादीचे लोमेश वैद्य व काँग्रेसचे गोपाल सावरबांधे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला. तसेच उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे कुंडलीक काटेखाये व काँग्रेसच्या निला पाथोडे यांनी अर्ज दाखल केला.
अखेर निवडणूक घेण्यात आली. यात ११ विरूद्ध ७ मतांनी पराभव करून लोमेश वैद्य सभापती तर कुंडलीक काटेखाये उपसभापती पदावर निवडून आले. यापूर्वी बाजार समितीची सत्ता काँग्रेसकडे होती. निवडणुकीनंतर सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेली आहे. बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी कोणता प्रयत्न करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. यावेळी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)