आवत्यासह अन्य बियाण्यांची तीन हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:01:03+5:30

उर्वरित बियाणे पेरणी क्षेत्रामध्ये धानाचे पºहे (नर्सरी ) व सोयाबिन, तीळ, हळद, कापूस व भाजीपाला आदी पीक पेरणी बियाणांचा समावेश आहे. सदर बियाणे पेरणी नुसार १३५० हेक्टर क्षेञात धान पऱ्हे ( नर्सरी ) , ५ हेक्टर क्षेत्रात सोयाबिन, ८ हेक्टर क्षेत्रात तीळ , ३० हेक्टर क्षेत्रात हळद, ६ हेक्टर क्षेत्रात कापूस , २१५ हेक्टर क्षेत्रात भाजीपाला व उर्वरीत हेक्टर क्षेत्रात आवत्या धान व तूर बियाणांची पेरणी करण्यात आली आहे.

Sowing of other seeds including avatya in an area of three thousand hectares | आवत्यासह अन्य बियाण्यांची तीन हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी

आवत्यासह अन्य बियाण्यांची तीन हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी

ठळक मुद्देलाखांदूर तालुका : पावसाचा सातत्यपणा आवश्यक

दयाल भोवते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : यंदाच्या खरीप हंगाम सन २०२० - २१ अंतर्गत लाखांदूर तालुक्यात जवळपास तीन हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रात आवत्या धानासह विविध पिकांच्या बियाणांची पेरणी पूर्ण झाली आहे. सदरची माहिती येथील तालुका कृषी विभागा अंतर्गत देण्यात आली.
यावर्षी रोहिणी नक्षत्र पासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यात खरीप हंगामातील शेती मशागतीला व पीक पेरणीला वेग आला होता.
धान उत्पादनासाठी अग्रेसर समजल्या जाणाऱ्या तालुक्यात प्रामुख्याने धान बियाणे पेरणी सह अन्य बियाणांची पेरणी देखील करण्यात आली आहे.
सदर बियाणे पेरणी अंतर्गत आवत्या धानापेक्षा तिप्पट तूर बियाणे पेरणी करण्यात आल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
तालुक्यात आवत्या धानाची पेरणी जवळपास ३८० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे तर या तुलनेत ११६० हेक्टर क्षेञात तूर बियाणांची लागवड करण्यात आली आहे.
उर्वरित बियाणे पेरणी क्षेत्रामध्ये धानाचे पऱ्हे (नर्सरी ) व सोयाबिन, तीळ, हळद, कापूस व भाजीपाला आदी पीक पेरणी बियाणांचा समावेश आहे.
सदर बियाणे पेरणी नुसार १३५० हेक्टर क्षेञात धान पऱ्हे ( नर्सरी ) , ५ हेक्टर क्षेत्रात सोयाबिन, ८ हेक्टर क्षेत्रात तीळ , ३० हेक्टर क्षेत्रात हळद, ६ हेक्टर क्षेत्रात कापूस , २१५ हेक्टर क्षेत्रात भाजीपाला व उर्वरीत हेक्टर क्षेत्रात आवत्या धान व तूर बियाणांची पेरणी करण्यात आली आहे. सदरची एकुण पीक बियाणे पेरणी जवळपास ३ हजार १५४ हेक्टर क्षेञात पुर्ण झाल्याची माहिती लाखांदूर तालुका कृषी विभागा अंतर्गत देण्यात आली.
दरम्यान, बियाणे पेरणी पूर्ण होऊन तालुक्यात पावसाची नियमीत हजेरी लागत असल्याने पेरणी खालील बियाणांची काही भागात उगवण देखील झाली आहे.
तर कृषी विज पंप धारक शेतकऱ्यांच्या शेतातील पऱ्ह्यांची मोठ्या प्रमाणात उगवण झाली असल्याचे वास्तव आहे. एकंदरीत पीक पेरणी सह तालुक्यात नियमीत समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकºयांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Sowing of other seeds including avatya in an area of three thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती