शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

१़६६ लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली

By admin | Updated: July 19, 2015 00:46 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असलातरी भंडारा जिल्ह्यातील ...

भंडारा : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजपर्यत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असलातरी भंडारा जिल्ह्यातील १ लाख ६६ हजार १३६ हेक्टर क्षेत्रातील पेरणी खोळंबली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्यस्थितीत ३२ हजार ५०३ हेक्टर क्षेत्रात पिकाची पेरणी धोक्यात आली आहे़ जिल्ह्यात एक लाख ९८ हजार ६३९ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होत असून, आतापर्यंत केवळ १६ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १७ हजार ३४६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १७ हजार १८० हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ९९ एवढी आहे. यामध्ये भंडारा तालुक्यात २,६९२ हेक्टर, पवनी २,३०० हेक्टर, मोहाडी ३,२५५ हेक्टर, तुमसर २,८८०, साकोली १,६६२, लाखांदूर २,६३१ तर लाखनी तालुक्यात २,०२८ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी १० हजार २११ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ८ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड केलेली आहे. त्याची टक्केवारी ८४ एवढी आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड लाखनी तालुक्यात असून २,५७९ हेक्टर आहे. भंडारा ७६ हेक्टर, पवनी १,९९५, मोहाडी ६०, तुमसर निरंक, साकोली १,३८५ तर लाखांदूर तालुक्यात २,४८९ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात तुर ८,८७२, मुंग १२, तीळ ५८, सोयाबिन २,२३२, ऊस ४,०२२, हळद ४१०, कापूस ५१८, तर भाजिपाल्याची ४९९ हेक्टरमध्ये लागवड झाली. (नगर प्रतिनिधी)रोवणी चार टक्के पूर्णजिल्ह्यात १ लाख ६७ हजार ८० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी केवळ ७,१४२ हेक्टर क्षेत्रात रोवणी लागवड केलेली आहे.मजुरांची मजुरी कडाडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ बियाने खते किटकनाशके यांच्या भावात कमालीची वाढ झाली आहे़