पेरणी निम्म्यावर, पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:49 IST2017-08-01T23:49:26+5:302017-08-01T23:49:57+5:30
अस्मानी व सुलतानी संकटाने यावर्षीही शेतकºयांचा पिच्छा सोडलेला नाही.

पेरणी निम्म्यावर, पिके करपली
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अस्मानी व सुलतानी संकटाने यावर्षीही शेतकºयांचा पिच्छा सोडलेला नाही. पावसाळ्यातील ज्या दिवसात नदी-नाल्यांना पूर येतो त्या दिवसातच पावसाने डोळे वटारल्याने शेतकºयांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यात फक्त ५० टक्के पेरणी झाली असून पºहे करपल्याने रोवणी खोळंबलेली आहे.
एकंदरीत जगायचे की मरायचे, अशी मरणासन्न अवस्था व तेवढीच बिकट स्थिती शेतकºयांपुढे येऊन ठेपली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात फक्त एकूण क्षेत्रापैकी जवळपास ३० टक्के धानपेरणी झालेली आहे. यावर्षी एक लक्ष ८२ हजार हेक्टर क्षेत्रात धानपिक लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपुर्वीच्या आकडेवारीत पेरणी २७ टक्के दाखविण्यात आली होती. विशेष म्हणजे यात दोन तालुक्यांचा सहभाग नव्हता. खरीप हंगामानंतर भात, तृणधान्य, कडधान्य अंतर्गत आतापर्यंत दोन लक्ष ८७५० सर्व साधारण क्षेत्रापैकी ६४ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची नोंद आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकºयांनी पेरणी व नंतर रोवणी कामेही धडाक्यात पूर्ण केली परंतु ज्यांच्याकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही, असे बहुतांश शेतकरी आजही वरूण राजाच्या कृपादृष्टीवर आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पºहे वाळलेली असून काही ठिकाणी पºहे बांधलेले गठ्ठेही सुकले.
ऐन पावसाळ्यात दुष्काळी स्थिती
धो धो पाऊस बरसण्याऐवजी पावसाने पाठ फिरविल्याने ऐन पावसाळ्यात अवर्षणाची स्थिती निर्माण झाली आहे. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत पावसाने सरासरीही गाठलेली नाही. ३१ जुलैपर्यंत सरासरी ६५२ मि.मी. पाऊस बरसायला हवा. परंतु सध्यस्थितीत याची सरासरी टक्केवारी ६५ इतकी असून सरासरी ४२२ मि.मी. पाऊस बरसला आहे. परिणामी सिंचनासोबत भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.