बच्चू कडू यांनी जाणल्या उपोषणकर्त्यांच्या व्यथा
By Admin | Updated: April 11, 2017 00:37 IST2017-04-11T00:37:27+5:302017-04-11T00:37:27+5:30
मॉयल प्रवेशद्वारासमोर डोंगरी बुज. येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु केले आहे. या उपोषण मंडपाला आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

बच्चू कडू यांनी जाणल्या उपोषणकर्त्यांच्या व्यथा
मॉयल प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थ : विधानसभेत प्रश्न लावून धरण्याचे आश्वासन
तुमसर : मॉयल प्रवेशद्वारासमोर डोंगरी बुज. येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु केले आहे. या उपोषण मंडपाला आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
मॉयल प्रशासनाविरुद्ध डोंगरी ग्रामस्थांनी ५ मार्च पासून उपोषण सुरु केले आहे. त्याची दखल भंडारा जिल्हा प्रशासनाने घेतलेली नाही. ही माहिती अचलपुरचे आमदार बच्चू कडू यांना होताच त्यांनी भंडारा येथे आक्रोश मोर्चाकरिता आल्यानंतर या उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी येथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची उपोषण करण्याबाबतच्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. सदर प्रकरण गंभीर स्वरुपाचे असून विधानसभेत हा मुद्दा लावून धरण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले.
मॉयलमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.
उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याने मॉयलच्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचे त्यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले.
यावेळी शंकरदादा बडवाईक, ओमप्रकाश लांजेवार, जयप्रकाश शर्मा, राजेश पाखमोडे, धर्मेंद्र धकेता यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका/शहर प्रतिनिधी)