रंजित चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मागविला आहे. नदीपात्रातून पाण्याचा उपसा सौर ऊर्जेवर होणार असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त दरात पाणी उपलब्ध होणार आहे.सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर शेती सिंचित करण्याची क्षमता महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची आहे. मात्र येथे विजेची समस्या कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. हा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य शासनाने सौर उर्जा प्रकल्पांतर्गत प्रस्ताव मागविला आहे. राज्यात असणाºया उपसा सिंचन प्रकल्पात सौर उर्जेवर पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प योजनेत सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. वनविभागाच्या संरक्षित जंगलाशेजारी असणाऱ्या या प्रकल्पाच्या जागेचा शोध घेण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली सौर ऊर्जा प्रकल्प संचालित करण्यात येणार आहे. सोंड्याटोला प्रकल्प क्षेत्रात २ हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या जागेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. हा प्रस्ताव ‘मेडा’ कडे सादर केला जाणार आहे.सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सोंड्याटोलाला विजेचा पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे भारनियमनाची समस्या कायमची संपुष्टात येईल. तसेच शेतकऱ्यांना विजेचे बिलही अत्यल्प येणार आहे. जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर म्हणाले, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे विजेची बचत होईल आणि शेतकऱ्यांना बळ मिळेल. सिहोराचे शाखा अभियंता एन.जे. मिश्रा म्हणाले प्रकल्पासाठी जागेचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव मेडाला पाठविण्यात येईल.वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाईनदीपात्रात पाणी असताना थकीत बिलापोटी सोंड्याटोलाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आमदार चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाने आॅक्टोबर महिन्यात उपसा सुरु झाला. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. आता या पुढे सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यानंतर थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकाराला ब्रेक लागणार आहे.राज्यातील उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामुळे स्वस्त दरात पाणी मिळणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणार नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचन करणे सोईचे जाणार आहे.-चरण वाघमारे, आमदार तुमसर
सोंड्याटोला प्रकल्प सौर ऊर्जेवर पाण्याचा उपसा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:30 IST
तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सौर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव मागविला आहे. नदीपात्रातून पाण्याचा उपसा सौर ऊर्जेवर होणार असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त दरात पाणी उपलब्ध होणार आहे.
सोंड्याटोला प्रकल्प सौर ऊर्जेवर पाण्याचा उपसा करणार
ठळक मुद्देशासनाने मागविला प्रस्ताव : शेतकऱ्यांना मिळणार स्वस्त दरात पाणी