सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित

By Admin | Updated: March 31, 2015 00:50 IST2015-03-31T00:50:05+5:302015-03-31T00:50:05+5:30

सिहोरा परिसरात असलेल्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे.

Sondito breaks power supply of Lift Irrigation Project | सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित

रंजित चिंचखेडे ल्ल चुल्हाड (सिहोरा)
सिहोरा परिसरात असलेल्या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. या प्रकल्पस्थळात असणाऱ्या अन्य समस्या नियोजनअभावी अडल्या असून लोकप्रतिनिधी व प्रशासनावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.
सिहोरा परिसरात १४ हजार हेक्टर आर शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी युती शासनाच्या काळात बावनथडी नदीवर ११० कोटी खर्चाची महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात आली आहे. आघाडी शासनाच्या काळात ही योजना पूर्ण करण्यात आली असून बावनथडी नदीवर धरण बांधकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यात प्रकल्प पाण्याचा उपसा करीत आहे. या पाण्याची साठवणूक चांदपूर जलाशयात करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांवर अवाढव्य खर्चाचा भार पडत नाही. परंतु शासन आणि लोकप्रतिनिधीचे या महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे दुर्लक्ष दिसून येत आहेत. या प्रकल्पस्थळाच्या टाकीत दरवर्षी गाळ जमा होतो. यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी उपसा करताना पंगगृहात अडचणी निर्माण होतात. प्रकल्पस्थळात देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे नियोजन मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात करण्यात येत आहे. परंतु अद्याप देखभाल दुरुस्ती प्रक्रियेच्या नियोजनाची सुरुवात करण्यात आली नाही. टाकीत अद्याप ही ८.१० फूट गाळ आहे. वर्षात ही गाळ उपसा करण्यासाठी मोठे आंदोलन सिहोऱ्यात उभारण्यात आले होते. परंतु सत्तापालट झाल्याने आंदोलनकर्ते राजकीय पुढारी शांत झाली आहे. या प्रकल्पस्थळाकडे महावितरणची जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याची ३६ हजार ८१० रुपयाची वीज बिलाची थकबाकी आहे. यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली आहे. ७ मार्च पासून प्रकल्प स्थळात अंधाराचे साम्राज्य झाले आहे.
सातपुडा पर्वतरांगाच्या घनदाट जंगलात हा प्रकल्प असल्याने अंधारात रात्री भीत भीत कार्यरत सुरक्षा रक्षक सेवा देत आहेत. कोट्यवधीची प्रकल्पाला सुरक्षा ही उपेक्षित आहे. ९ सुरक्षा गार्डाची गरज असताना ३ सुरक्षा गार्ड तैनात करण्यात आली आहे. २४ तास हे सुरक्षा गार्ड प्रकल्पाची सुरक्षा करीत आहेत. या प्रकल्पस्थळात कुणी जबाबदार अधिकारी फिरकून पाहत नाही. यामुळे सुरक्षा रक्षकच सर्वेसर्वा दिसून येत आहेत. या प्रकल्पस्थळात नियोजन आणि विकासकामाची मंजूरी देणारे कार्यालय गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरात आहे. यामुळे प्रकल्पाचा प्रशासकीय कारभार रामभरोसे सुरु आहे. एकच शाखा अभियंता गेल्या अनेक वर्षापासून या प्रकल्प स्थळात तळ ठोकून आहे. यामुळे प्रकल्प स्थळात आलबेल सुरु आहे. निधी आणि नियोजन अभावी या प्रकल्पाला उतरती कळा आली आहे. प्रकल्पस्थळात ९ पंपगृह आहेत.
परंतु आजवर ४ किंवा ५ पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात आलेला आहे. अनेक पंपगृहात बिघाड आहे. प्रकल्पस्थळात समस्या निकाली काढण्यासाठी निधीचा अभाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिकार दुरुस्ती करिता २५.३० लाखांची गरज आहे. अथवा नव्याने चिकारचे बांधकाम करण्यासाठी कोट्यवधीची आवश्यकता आहे. परंतु हा निधी खेचून आणण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाही. सध्या चिकारची डागडुजी करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला आहे. या कार्यात २.३ लाख खर्च अपेक्षित आहे. परंतु चिकारची स्थिती जैसे थे होणार आहे.
बावनथडी, वैनगंगा आणि चांदपूर जलशायाच्या खोऱ्यात असणाऱ्या या परिसरात राजकीय इच्छाशक्ती अभावी प्रभावी सिंचनाला उतरती कळा येत आहे. मागील वर्षात हिरवेगार दिसणारे शेत शिवारात ओसाडाचे चित्र आहे.

पाण्याच्या नियोजनाचा अभाव
बावनथडी नदीचे पात्र पूर्णत: आटले आहे. या नदीवर असणारी नळ योजना अडचणीत आलेली आहे. या शिवाय महत्वाकांक्षी सोंड्या टोला उपसा सिंचन प्रकल्पात पाण्याचा एक थेंब नाही. नदीपात्रात पाणीच नसल्याने शेतकऱ्यांचे पंप कोरडपडत आहेत. बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची बोंबाबोंब गावात आहे. परंतु लोकप्रतिनिधींनी या संदर्भात चुप्पी साधली आहे. जनता आणि शेतकरी अडचणीत असताना कुणी बोलत नाही.
चिकार झाले जीर्ण
प्रकल्पाचे उपसा करण्यात येणारे पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहेत. या जलाशयाचे पाणी वाटपात नियोजनाचा अभाव जानवतो. ब्रिटीशकालीन चिकार (विहीर) ला १०७ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चिकार जीर्ण झाला असून पाणी वाटपात संकट आणणारा आहे. पाणी सोडताना चिकारला कंपन येत आहे. यंदा चिकारचे दरवाजे तुटल्याने जलाशयातील पाणी रिकामे करण्यात आले आहे. यामुळे रब्बी हंगामात उन्हाळी धानाचे पीक शेतकऱ्यांना घेता आले नाही.

Web Title: Sondito breaks power supply of Lift Irrigation Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.