भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मुलाने केला वयोवृद्ध वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 12:26 IST2019-02-04T12:26:19+5:302019-02-04T12:26:53+5:30

घरगुती वादात काठीने बेदम मारहाण करून मुलाने आपल्या वृद्ध पित्याचा खून केल्याची घटना तुमसर तालुक्याच्या पचारा येथे रविवारी रात्री घडली.

The son murdered hisfather in Tumsar taluka of Bhandara district | भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मुलाने केला वयोवृद्ध वडिलांचा खून

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मुलाने केला वयोवृद्ध वडिलांचा खून

ठळक मुद्देतुमसर तालुक्याच्या पचाराची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : घरगुती वादात काठीने बेदम मारहाण करून मुलाने आपल्या वृद्ध पित्याचा खून केल्याची घटना तुमसर तालुक्याच्या पचारा येथे रविवारी रात्री घडली.
तीर्थराज वरकडे (७०) असे मृताचे नाव आहे. रविवारी रात्री शुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. या वादात मुलगा राजू तीर्थराज वरकडे (४५) याने वडिलांला काठीने बेदम मारहाण केली. यातच तीर्थराजचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीर्थराजची पत्नी कमलाबाई यांनी तुमरसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: The son murdered hisfather in Tumsar taluka of Bhandara district

टॅग्स :Murderखून