प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:45 IST2019-01-13T21:45:29+5:302019-01-13T21:45:59+5:30
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यात याव्यात यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी भेट घेत सविस्तर चर्चा केली. यावर प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येईल असे आश्वासन सीईओ यांनी दिले.

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्राथमिक शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यात याव्यात यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी भेट घेत सविस्तर चर्चा केली. यावर प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येईल असे आश्वासन सीईओ यांनी दिले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने यापूर्वीही अनेकदा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला निवेदन देत समस्या सोडविण्यासाठी तगादा लावला होता. मात्र जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. परिणामी शिक्षकांच्या समस्येत वाढ होत असून त्यांच्यामध्ये असंतोष व्याप्त आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, विजय चाचेरे, केशव बुरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्टमंडळाने सीईओ रवींद्र जगताप यांच्या दालनात भेट घेतली. तसेच समस्येबाबत सविस्तर चर्चा केली. निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांतर्गत भविष्य निर्वाह निधीचे पासबुक देऊन ती अद्ययावत करण्यात यावी, डीसीपीएसधारकांची रक्कम खात्यावर जमा करावी, प्राथमिक शिक्षकांना जि.प. हायस्कूल रिक्त जागांवर शैक्षणिक पात्रतेनुसार पदस्थापना द्यावी, वरिष्ठ - निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी लिंक भरलेल्या सर्व पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण देण्याचे आयोजन करावे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ११७ शिक्षकांची स्टाफ पोर्टलला ‘करंट जॉयनिंग’ व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील रूजू दिनांक देण्यात यावी तसेच एनआयसीला पत्रव्यवहार करून २८ अपात्र शिक्षकांना पात्र करण्यात यावे, शाळेचे विद्युत देयक स्थानिक स्वराज्य संस्थांनी भरण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीला सूचना देण्यात यावी, वेतन तफावतीचे प्रकरण निकाली काढण्यात यावे, सहाव्या वेतन आयोगाचे थकबाकीचे हप्ते देण्यात यावे, विशेष म्हणजे जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करण्यात यावे, रिक्त असलेली उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदे सेवाज्येष्ठते नुसार भरण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी चर्चेदरम्यान रमेश सिंगनजुडे, ज्ञानेश्वर दमाहे, विजय चाचेरे, केशव बुरडे, केशव अतकरी, दिवाकर पांगुळ, डी.जी. भड, नरेश कोल्हे, प्रतिभा टेंभेकर, आशा गिºहेपुंजे, झाशीराम पटोले, कुशाबराव भोयर, श्रावण लांजेवार, प्रकाश महालगावे, संजय आजबले, दिलीप ब्राम्हणकर, विलास टिचकुले, पी.टी. हातझाडे, बी.जी. भुते, यशपाल बगमारे, आदेश बोंबार्डे, नेपाल तुरकर, संतोष खंडारे, सुरेश कोरे, नरेंद्र रामटेके, चैनराव जांभुळकर, एन.डी. शिवरकर, माणिक नाकाडे, राम गेडाम, मंगेश नंदनवार, योगेश पुडके, वसंत धांडे, विनय धुमनखेडे, संजय झंझाड, नरेंद्र गायधने, विलास दिघोरे, विनोद कुंभरे, आर.सी. शरणागत, राजकुमार चौधरी, धरती बोरवार, मंदा डोंगरे, विलास चौधरी आदी उपस्थित होते.