फौजदाराला ट्रकमधून फेकले

By Admin | Updated: March 21, 2017 03:25 IST2017-03-21T03:25:54+5:302017-03-21T03:25:54+5:30

जनावरांची वाहतूक करणारा ट्रक अडवून पोलीस ठाण्याकडे नेत असताना सहायक फौजदाराला आरोपींनी ट्रकमधून फेकून दिल्याची

The soldier was thrown out of the truck | फौजदाराला ट्रकमधून फेकले

फौजदाराला ट्रकमधून फेकले

भंडारा : जनावरांची वाहतूक करणारा ट्रक अडवून पोलीस ठाण्याकडे नेत असताना सहायक फौजदाराला आरोपींनी ट्रकमधून फेकून दिल्याची घटना रविवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावरील शहापूर गावाजवळ घडली. कारधा पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक फौजदार मेश्राम यात जखमी झाले आहेत.
मेश्राम रविवारी रात्री गस्तीवर होते. दरम्यान, कारधा टोलनाका येथे एक ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात १० ते १२ जनावरे निर्दयीपणे कोंबल्याचे त्यांना आढळले. त्यांनी ट्रक कारधा पोलीस ठाण्याकडे नेण्याचे चालकाला सांगितले. मात्र, कारवाईच्या भीतीने चालकाने ट्रक ठाण्याकडे न नेता नागपूरच्या दिशेने भरधाव नेला. मेश्राम यांनी विरोध केला असता चालकाने त्यांना शहापूर गावाजवळ धावत्या ट्रकमधून खाली फेकले. यामुळे मेश्राम यांना गंभीर दुखापत झाली आहे. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The soldier was thrown out of the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.