टसर रेशीम उद्योगाची पाहणी
By Admin | Updated: August 10, 2016 00:19 IST2016-08-10T00:19:34+5:302016-08-10T00:19:34+5:30
पवनी तालुक्यातील निष्टी येथील टसर रेशीम उद्योगाला जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली.

टसर रेशीम उद्योगाची पाहणी
समस्या जाणून घेतल्या : जिल्हाधिकारी चौधरी यांची भेट
भंडारा : पवनी तालुक्यातील निष्टी येथील टसर रेशीम उद्योगाला जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली.
टसर रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच निष्टी गावात जावून टसर रेशीम किटकांचे संगोपनाची पाहणी केली. गावातील १५० टसर कोसा उत्पादक विद्यार्थी कोसा उत्पदन करीत आहेत. टसर उत्पादक लाभार्थींनी अंडूपूजाची किंमत अडिच रुपयांवरुन तीन रुपये प्रती अंडीपूज वाढविण्यात आली असल्यामुळे लाभार्थ्यांना अंडीपूज रक्कम भरणे कठीण झाले आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कोसा उत्पादक झाल्यावर खासगी व्यापारी कोसा खरेदीला कमी भाव देतात. त्यामुळे उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.
यावर व्ही.पी. रायसिंग यांनी टसर कोसा उत्पादक सोसायटी मार्फत कोसा खरेदी व विक्री ते अंडीपूज वाटप करता येतील, तसेच धागाकरण करून कापड निर्मिती करणे सहज शक्य होईल, असे सूचविले. टसर कोसा उत्पादक सोसायटी यांचेशी प्रत्येक लाभार्थीकडून स्वत:चे भाग भांडवल जमा करायची तयारी असल्यास सोसायटी मार्फत शासकीय योजनांचा लाभ देता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी खासगी अंडीपूज व शासकीय रिलींग केंद्राची पाहणी केली.
शासकीय रिलींग केंद्राचे काम पुढील हप्त्यात सुरु करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यामुळे गावातील १५ ते २० महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील टसर रेशीम उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. यावेळी निष्टीचे सरपंच विलास डहारे, टसर कोसा उत्पादक सोसायटीचे अध्यक्ष चंदू डहारे, वामन डहारे, रेशीम विकास अधिकारी एस.के. शर्मा उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)